ठाणे - काही दिवसांपूर्वी फेसबुकवर मैत्री झालेल्या एका मैत्रिणीने मित्राला गंडवल्याची घटना उघकीस आली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या मित्राने दिलेल्या तक्रारीवरून त्या मैत्रिणीविरोधात विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नरेंद्र भिवाजी देसाई (वय 68 वर्षे, रा. कैलासनगर, डोंबिवली पश्चिम) यांची नॅन्सी विल्यम नावाच्या महिलेशी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली होती. याच मैत्रीचा फायदा घेत तिने ब्रिटिश एअरवेजने दिल्ली विमानतळावर उतरल्याचा मेसेज देसाई यांना पाठविला. तसेच 210 ग्रॅम सोने जवळ बाळगल्याने इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली असून सीमा शुल्क भरावे लागणार असून तातडीने पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार देसाई यांनी एका ज्वेलर्सकडे दागिने गहाण ठेवून 63 हजार रुपये नॅन्सीने सांगितल्याप्रमाणे सीमा शहा नावाच्या महिलेच्या बँक खात्यावर ऑनलाईन ट्रान्स्फर केले. तसेच सीमा शुल्काची पावती पाठविण्यास सांगितले.
हेही वाचा - झाडाझुडुपात आढळली एक महिन्याची जिवंत 'नकोशी', परिसरात खळबळ
मात्र, त्यानंतर तिने पावती किंवा पैसे न पाठविता फोन बंद केला. यावरून आपली फसवणूक केल्याचे समजतात. त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन भामट्या मैत्रिणी विरोधात गुन्हा दाखल केला. आता पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - आसनगावजवळ कार आणि गॅस टँकरमध्ये भीषण अपघात; २ जण जागीच ठार, २ गंभीर