ठाणे : आज पर्यंत तुम्ही अनेकदा लहान भाऊ हा मोठ्या भावाची प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यामध्ये प्रगती केल्याचं ऐकलं असेल, परंतु ठाण्यात एका मोठ्या भावाने लहान भावाची प्रेरणा घेत आपल्या आयुष्यात लक्षणे बदल घडवले आहेत. त्याने साहित्य आणि कला क्षेत्रात ( The field of literature and art )उत्तम कामगिरी केली आहे. त्याच्या या कामाची दखल घेत या युवा तरुणाला युवा दिनाच्या (Youth Day) पार्श्वभूमीवर देशपातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ओमकार पिसे (Award winner Omkar Pise )या तरुणाला 'प्राइड ऑफ यंग हिंदुस्तान' पुरस्काराने ( Pride of Young Hindustan Award ) सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यात अग्रगण्य भूमिका बजावणाऱ्या तरुणांसाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पुरस्कारासाठी ठाणेकर रहिवासी असलेल्या ओमकार पिसे या तरुणाची निवड करण्यात आली. उल्हासनगर येथील एसएचएम महाविद्यालयात (SHM College Ulhasnagar ) समाजसेवा, चित्रपट, वैद्यक, संशोधन व संशोधन, कला व साहित्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्याबद्दल देशातील विविध राज्यांतील तरुणांची सामाजिक संस्था यंगिस्तान फाउंडेशनतर्फे ( Social organization Youngistan Foundation ) 'प्राईड ऑफ यंग हिंदुस्थान' पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. कला आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ओमकार पिसे या तरुणाच्या कार्याची दखल घेत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशभरातून आलेल्या 30 स्पर्धकांमध्ये ओंकार पिसे या तरुणाची निवड करण्यात आली आहे.
लहानपणापासूनच भाषणाची आवड असलेल्या सातारकर असलेला ओंकार पिसे काही वर्षापूर्वी ठाण्यात आला. आपला लहान भाऊ लहानपणापासून विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवतो, याबाबत कुतुहल वाटत असे. त्यामुळे ओंकारने शिक्षणाबरोबरच कला आणि साहित्य क्षेत्राच्या माध्यमातून समाजावर अन्याय होणार्या घटकाबद्दल आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने महाविद्यालयात असलेल्या एनएसएस (National social service ) तसेच पथनाट्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी समाज प्रबोधन केले. अंधश्रद्धा असलेल्या आदिवासी पाड्यात देखील अनेक वेळा पथनाट्य करून जनजागृती केली. त्यानंतर राज्यस्तरीय तसेच देशपातळीवरील भाषणाच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन पारितोषिके मिळवली.
भविष्यात देखील अशीच उल्लेखनीय कामगिरी करून समाजसेवा तसेच साहित्य कला क्षेत्रातून प्रबोधन घडवणार, असे ओमकार पिसे यांनी सांगितले. ओमकारचे वडील पोलीस खात्यात आहेत. मला माझ्या मुलाबद्दल अभिमान असल्याचे ते सांगतात. सर्वच पालकांना माझ्या मुलासारखा मुलगा मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. लहानपणापासूनच भाषणाचे आवड असलेल्या ओमकारला त्याच्या वडिलांनी त्यांच्या भविष्याबाबत स्वातंत्र्य दिल्याने, ओमकारने एवढी प्रगती केल्याचे वडील सांगतात.