ETV Bharat / state

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस नाही, यंदा पाणी कपातीची टांगती तलवार - ठाणे धरण बातमी

मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार जिल्ह्यातील धरणांच्या पणलोट क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. यामुळे यंदा जिल्ह्यातील नागरिकांवर पाणी कपातीची टागंती तलवार लटकत आहे.

dam
dam
author img

By

Published : Jul 30, 2020, 7:35 PM IST

ठाणे - मुंबईसह ठाण्याला पाणीपुरवठा करणारे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नसल्याने धरणांत पाणीसाठा कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या जुलै अखेरच्या दिवशी भरलेल्या मोडक सागरसह, तानसा, बारवी धरणात धरणांमध्ये 100 टक्के पाणी साठा होऊन ते भरले होते. मात्र, या वर्षी पावसाळ्यात धरणांमध्ये आजपर्यंत 50 टक्केही पाणी साठा झालेला नाही. त्यामुळे धरणांच्या पाणी साठ्याविषयी चिंता वाढली आहे. पावसाचा जोर वाढण्याची गरज आहे. अन्यथा यंदा पाणी कपात अटळ असल्याचे चित्र दिसत आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरांना, उद्योग, कारखाने आणि कंपन्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या बदलापूर नजीकच्या बारवी धरणात गेल्या वर्षी आजच्या दिवशी 102 टक्के पाणीसाठा होता. जुन्या पाणीपातळीनुसार हे धरण भरले होते. नव्याने वाढवलेल्या उंचीनुसारही ते पुढील तीन दिवसांत भरल्यामुळे दरवाजे उघडावे लागले होते. मात्र, या पावसाळ्यात बारवीत 48.53 टक्के पाणी साठा झाला आहे. आज (दि. 30 जुलै) केवळ 4 मिमी पाऊस पडला आहे. या धरणात आतापर्यंत 165.43 दशलक्ष घनमीटर पाणी साठा झाला आहे. या आठवड्यात फक्त 7.96 दशलक्ष घनमीटर पाणी साठा वाढला आहे. या प्रमाणेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदरला पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणातही 33.19 टक्के पाणी साठा झाला. गेल्या वर्षी तो 72.42 टक्के होता.

मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर धरण गेल्या वर्षी आजच्या दिवशी 100 टक्के भरले होते. पण, आज या धरणात फक्त 40 टक्के पाणी साठा आहे. आज (दि. 30 जुलै) 16 मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे. आठवड्यात फक्त 3 दशलक्ष घनमीटर पाणी साठा वाढला आहे. भातसा धरणात 52.94 टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी तो 88 टक्के होता. या धरणात गुरुवारी (30 जुलै) फक्त 2 मिमी पाऊस पडला आहे. भातसात या आठवड्यात 38 दशलक्ष घनमीटर पाणी साठा वाढला आहे. तानसा धरणात आजपर्यंत फक्त 25.47 टक्के पाणी साठा आहे. गेल्या वर्षी तो 99.38 टक्के होता. आठवड्यात दोन दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वाढला आहे. तर आज 2 मिमी पाऊस पडला. मध्यवैतरणा धरणात आतापर्यंत 33.86 टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी तो 93.94 टक्के होता. आज या धरणात सर्वाधिक 32 मिमी पाऊस पडला आहे. धरणांतील या चिंताजनक पाणी साठ्यामुळे काळजी वाढली आहे. आगामी दिवसात धरणांच्या या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अन्यथा पाणी टंचाईचा सामना नागरिकंना करावा लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.