ठाणे - तुम्ही प्रशासकीय कर्मचारी आहात आणि तुम्ही लस घेतली नसेल ( Government Employees Didnt Vaccinated ) तर तुम्ही तुमच्या वेतनाला मुकणार ( No Vaccine No Salary ) आहात. तसेच लस न घेणाऱ्या व्यक्तीना आता प्रशासकीय कार्यालयात प्रवेश मिळणार नाही. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता ( Vaccination To Stop Covid Spread ) अशी कठोर भूमिका ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी हे अनेक लोकांच्या संपर्कात ( Government Employees Covid Super Spreader ) येतात. यासाठी असा निर्णय घेण्यात आला असंल्याच ठाणे जिल्हाधिकारी ( Thane District Collector ) राजेश नार्वेकर ( IAS Rajesh Narvekar ) यांनी सांगितले आहे.
प्रशासकीय कर्मचारी ठरताहेत स्प्रेडर
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लोक सैरभैर झाली होती. कारण त्यावेळी कोरोनासारख्या आजारावर ना उपाय होता, ना लस होती. त्यानंतर अचानक दुसरी लाट आली. त्यावेळी कोरोनावर औषधे उपलब्ध होती आणि लस ही आली होती. परंतु नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर लस घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यास सुरवात झाली होती. काही प्रमाणात नागरिकही लस घेण्यास गर्दी करू लागले होते. परंतु आज ही काही लोक, काही कारणास्तव लस घेत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढतोय. खासकरून प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी लस घेणे गरजेचे आहे, कारण ते अनेक लोकांच्या संपर्कात येत असतात. काही विभागात अजूनही असे कर्मचारी व अधिकारी आहेत ज्यांनी कोरोनाची लस घेतली नाही.
ठाण्यात झपाट्याने वाढतेय संख्या
दुसरीकडे ठाण्यात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. जवळपास ३५ हजार कोरोना रुग्ण ठाणे जिल्ह्यात आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच सरकारी कर्मचाऱ्यांना लस घेणे आवश्यक आहे. ठाण्यातील कोणत्याही प्रशासकीय कार्यालयात ज्या व्यक्तींनी लस घेतली नाही, त्यांना प्रेवश दिला जाणार नाही. तर ज्या प्रशासकीय कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी लस घेतली नाही, त्यांना वेतन मिळणार नाही, अशी कठोर भूमिका ठाणे जिल्हाधिकारी यांनी घेतलीये. तसेच पालिका व महानगरपालिकांनी आपल्या स्तरावर याबाबत निर्णय घ्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे.
फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे विशेष लसीकरण
लसीकरणात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस घेणे बंधनकारक आहे. कारण त्यांचा इतर सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क येणार आहे. त्यांचे काम हे महत्वाचे आहे. म्हणूनच अशा प्रकारे बंधनकारक अटी घातल्या जात आहेत. जेणेकरून शासकीय कर्मचारी सुरक्षित राहतील. त्यासाठी विशेष वेळ देऊन फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे.