ETV Bharat / state

'निसर्ग संवर्धन' समितीच्या पुढाकाराने खडवली नदीवर स्वच्छता अभियान - khadavali

नदी पात्रातील स्वच्छता करण्यासाठी निसर्ग स्वरक्षण समितीची तरुणाई सरसावली असून समितीच्या पुढाकाराने दर रविवारी नदी पात्रातील घाण काढून स्वच्छता व साफसफाईचे अभियान राबवले जात आहे.

'निसर्ग संवर्धन' समितीच्या पुढाकाराने खडवली नदीवर स्वच्छता अभियान
author img

By

Published : May 27, 2019, 8:33 AM IST

ठाणे - वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने कल्याण तालुक्यातील खडवली नदीवर हजारो नागरिक थंडा थंडा कुल कुल होण्यासाठी धाव घेतात. मात्र, नदी पात्रात गेल्या काही महिन्यापासून घाणीचे साम्राज्य पसरून पर्यटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे नदी पात्रातील स्वच्छता करण्यासाठी निसर्ग स्वरक्षण समितीची तरुणाई सरसावली असून समितीच्या पुढाकाराने दर रविवारी नदी पात्रातील घाण काढून स्वच्छता व साफसफाईचे अभियान राबवले जात आहे.

'निसर्ग संवर्धन' समितीच्या पुढाकाराने खडवली नदीवर स्वच्छता अभियान

कल्याण - कसारा रेल्वे मार्गावरील खडवली रेल्वे स्थानकानजीक असलेल्या खडवली नदीचे पाणी स्वच्छ आणि खळखळून वाहत असल्यामुळे या नदीवर वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही कमी करण्यासाठी मुंबई, ठाणे, नाशिक जिल्ह्यातून हजारो पर्यटक येत असतात. मात्र, काही हुल्लडबाज पर्यटक नदी पात्रातच मद्यपान करून बाटल्या तिथेच फोडतात, तर काही पर्यटक दुपारच्या जेवणातील उरलेले खाद्यपदार्थही नदी पात्राजवळच टाकून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण करतात. काही स्थानिक गावकरी नदीमध्ये गाड्या आणि कपडे धुण्यासाठी नदीवर येतात. त्यामुळे नदीचा परिसर घाण होतो.

खळबळजनक बाब म्हणजे नदी शेजारी असलेल्या गावांना याच नदीतून कुठलीही प्रकिया न करता स्थानिक प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जातो. यामुळे हजारो गावकऱ्यांचे या दुषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते, तर गावातील सांडपाणीही थेट नदी पात्रात सोडल्याने नदीच्या पात्रात दुर्गंधीयुक्त पाणी पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे नदी पात्रात घाणीचे साम्राज्य पसरून शेवाळ तयार झाले आहे.

स्थानिक गावकऱ्यांनी पोलीस आणि प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. मात्र, मागणी करूनही प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना राबवली जात नाही. यामुळे निसर्ग संवर्धन समितीने पुढाकार घेवून दर रविवारी सकाळपासून नदी पात्र व जवळील परिसरात स्वछता अभियान राबवत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. त्यामुळे हा कौतुकास्पद उपक्रम आहे.

 निसर्ग संवर्धन समितीच्या पुढाकाराने खडवली नदीवर स्वच्छता  अभियान   

ठाणे :-वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने कल्याण तालुक्यातील खडवली नदीवर  हजारो नागरिक थंडा थंडा कुल होण्यासाठी धाव घेतात. मात्र नदी पात्रात गेल्या काही महिन्यापासून घाणीचे साम्राज्य पसरून पर्यटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे नदी पत्रातील स्वच्छता  करण्यासाठी  निसर्ग स्वरक्षण समिती तरुणाई सरसावली असून समितीच्या पुढाकाराने दर रविवारी नदी पत्रातील घाण काढून  स्वच्छता व सफसफाईचे अभियान राबवले जात आहे.  

कल्याण – कसारा रेल्वे मार्गावरील खडवली रेल्वे स्थानकानजीक असलेल्या खडवली नदीचे पाणी स्वच्छ आणि खळखळून वाहत असल्यामुळे या नदीवर वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही कमी करण्यासाठी मुंबई, ठाणे नाशिक जिल्ह्यातून हजारो पर्यटक येत असतात. मात्र काही हुल्लडबाज पर्यटक नदी पात्रातच मद्यपान करून दारू पिऊन बाटल्या तिथेच फोडतात. तर काही पर्यटक दुपारच्या जेवणातील उरलेले खाद्यपदार्थही नदी पात्राजवळच टाकून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण करतात. काही स्थानिक गावकरी नदीमध्ये गाड्या आणि कपडे धुण्यासाठी नदीवर येतात. 

खळबळजनक बाब म्हणजे नदी शेजारी असलेल्या गावांना याच नदीतून कुठलही प्रकिया न करता स्थानिक प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जातो. यामुळे हजारो गावकऱ्यांचे या दुषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतो. तर गावातील सांडपाणीही थेट नदी पात्रात सोडल्याने नदीच्या पत्रात दुर्गंधीयुक्त पाणी पाहवयास मिळत आहे. त्यामुळे  नदी पात्रात घाणीचे साम्राज्य होवून शेवाळ तयार झाले आहे. तर स्थानिक गावकऱ्यांनी स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. मात्र मागणी करूनही प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना राबविली जात नाही. यामुळे निसर्ग संवर्धन समितीने  पुढाकार घेवून दर रविवारी सकाळपासून नदी पात्र व जवळील परिसरात स्वछता अभियान राबवत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना प्रतिक्रीया दिली. .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.