ETV Bharat / state

टोरंटविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; जबरदस्तीने टोरंट लादल्यास जबरदस्तीनेच परत पाठवू - जितेंद्र आव्हाड - ठाणे

जनसामान्यांचा ज्या टोरंटला विरोध आहे. त्या टोरंटला सरकारकडून कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर परिसरावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टोरंटविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; जबरदस्तीने टोरंट लादल्यास जबरदस्तीनेच परत पाठवू - जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Jun 18, 2019, 11:40 PM IST

ठाणे - जनसामान्यांचा ज्या टोरंटला विरोध आहे. त्या टोरंटला सरकारकडून कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर परिसरावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांचा हा प्रयत्न आम्ही उधळून लावू, जनसुनावणी घेऊन जनसामान्यांचे ऐकून घेऊ. मात्र, टोरंटला जोरजबरदस्तीने आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रत्युत्तरही तसेच दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

टोरंटविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; जबरदस्तीने टोरंट लादल्यास जबरदस्तीनेच परत पाठवू - जितेंद्र आव्हाड

कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर परिसरात वीज वितरणाचे खासगीकरण करुन टोरंट कंपनी लादली जात आहे. त्या विरोधात राष्ट्रवादीने एल्गार पुकारला आहे. कळवा-मुंब्रा-शीळमधील वीज ग्राहकांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतरही या विभागाचे खासगीकरण झाले असून टोरेंट पॉवर कंपनीला या परिसरातील वीज वितरणाचे हक्क पुढील 20 वर्षांसाठी देण्यात आले आहेत.

या परिसरातील वीज वितरणाचे खाजगीकरण केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून या नागरिकांकडून या खासगीकरणाला विरोध केला जात होता. मात्र, खासगीकरणाला होणारा विरोध डावलून महावितरणने शीळ, मुंब्रा आणि कळवा या परिसराच्या वीज वितरणाचे काम टोरेंट पॉवर कंपनीला दिले. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे. 24 जूनपर्यंत जर टोरंटचा ठेका रद्द करण्यात आला नाही तर 25 जून रोजी कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर बंद करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन करण्यात आला आहे.

Intro:टोरंटविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार जोरजबरदस्तीने टोरंट लादले तर जबरदस्तीनेच परत पाठवू जितेंद्र आव्हाड यांचा इशाराBody:जनसामान्यांचा ज्या टोरंटला विरोध आहे. त्या टोरंटला सरकारने कळवा- मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर परिसरावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांचा हा प्रयत्न आम्ही उधळून लावणार आहोत. जनसुनावणी घेऊन जनसामान्यांचे ऐकून घेऊ. पण, तसे काहीही न करता जर टोरंटला जोरजबरदस्तीने आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला तसेच प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

कळवा- मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर परिसरात वीज वितरणाचे खासगीकरण करुन टोरंट कंपनीला लादली जात आहे. त्या विरोधात राष्ट्रवादीने एल्गार पुकारला आहे. कळवा-मुंब्रा-शीळ मधील वीज ग्राहकांनी तीव्र विरोध दाखवल्यानंतरही या विभागाचे खासगीकरण झाले असून टोरेंट पॉवर कंपनीला या परिसरात वीज वितरणाचे हक्क पुढील 20 वर्षासाठी देण्यात आले आहेत. या परिसरातील वीज वितरणाचं खाजगीकरण केलं जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. तेव्हापासून या खाजगीकरणाला विरोध केला जात होता. मात्र, खासगीकरणाला होणारा विरोध डावलून महावितरणनं शीळ, मुंब्रा आणि कळवा या परिसराच्या वीज वितरणाचं काम टोरेंट पॉवर कंपनीला पुढील 20 वर्षासाठी दिले आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे. 24 जूनपर्यंत जर टोरंटचा ठेका रद्द करण्यात आला नाही तर 25 जून रोजी कळवा- मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर बंद करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

BYTE : आ. जितेंद्र आव्हाड - ( राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.