ETV Bharat / state

कोरोनाच्या महामारीमुळे यंदा गणेश मूर्तींचे विसर्जन आपल्या दारी - पालिका आयुक्त - Kalyan Dombivali Municipal Corporation news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोईसाठी 'विसर्जन आपल्या दारी' ही संकल्पना यावर्षीही राबविणार, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिली. गणेश उत्सवाच्या प्राथमिक तयारीबाबत आयोजिलेल्या ऑनलाइन मिटिंगमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
author img

By

Published : Aug 5, 2020, 5:20 PM IST

ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा फैलाव पाहता आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सोईसाठी 'विसर्जन आपल्या दारी' ही संकल्पना यावर्षीही राबविणार, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज(बुधवार) दिली. महापालिका क्षेत्रातील पोलीस अधिकारी, महापालिका अतिरिक्त आयुक्त, महापालिका उपायुक्त, तहसीलदार कल्याण तसेच प्रभागक्षेत्र अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांच्या समवेत गणेश उत्सवाच्या प्राथमिक तयारीबाबत आयोजिलेल्या ऑनलाइन मिटिंगमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या गणेशोत्सवात विसर्जनस्थळे तसेच शासनाच्या गाईडलाइन्सप्रमाणे मंडपांची उभारणी व तद्अनुषंगीक बाबींबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. विशेष म्हणजे कोकणात गणपतीसाठी जाणारे बहुतांश कोकणवासी यावर्षी कोकणात न जाता त्यांच्या राहत्या घरात गणपती आणणार आहेत. त्यामुळे घरगुती गणपतींची संख्या वाढू शकणार असल्याची शक्यता डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे यांनी व्यक्त केली. तर, सार्वजनिक गणपती मंडळांच्या विसर्जनासाठी सॅनिटायझेशनची आवश्यकता लागेल. त्याचप्रमाणे स्वयंसेवकही तयार ठेवावे लागतील. त्यासाठी पूर्वतयारी करण्याबाबत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

दरम्यान, यंदाही गणेशोत्सव मंडळांच्या लागणाऱ्या परवानगीसाठी महापालिकेच्या एस.ओ.पी. प्रमाणे एक खिडकी योजना सर्व संबंधित पोलीस स्थानकांमध्ये कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती पालिका आयुक्त यांनी उपस्थितांना दिली. तर, यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी शासनाच्या गाईड लाईनचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत पालिकेच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची येत्या शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता ऑनलाइन मिटिंग आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.