ETV Bharat / state

मंदिर बांधण्यासाठी १०-१० रुपये मागण्याची गरज काय?अस्लम शेख यांची भाजपावर टीका - अस्लम शेख भाजपा टीका न्यूज

भाईंदर पश्चिम येथील अग्रवाल ग्राउंडमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुंबई उपनगराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

Aslam Sheikh
अस्लम शेख
author img

By

Published : Jan 12, 2021, 7:53 AM IST

Updated : Jan 12, 2021, 8:35 AM IST

ठाणे - १०-१० रुपये जमा करून राम मंदिर का बांधतले जात आहे. सरकार तर भाजपाचेच आहे, मग त्यांना पैशाची कमी कसली. आता तर एमआयएमही भाजपाच्या टीममध्ये आहे. निवडणूक आली की एका बाजुला भागवत तर दुसऱ्या बाजूला ओवेसी दाखवायचे आणि राजकारण करायचे, असे वक्तव्य अस्लम शेख यांनी केले. भाईंदर पश्चिम येथील अग्रवाल ग्राउंडमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबई उपनगराचे पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते.

अस्लम शेख यांची भाजपावर टीका

मंदिरासाठी पैसे का गोळा करत आहेत ?

येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा महापौर बसणार, अशा विश्वास आहे. केंद्राच्या सर्व यंत्रणेचा भाजपा दुरूपयोग करत आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एकाही देशासोबत आपले संबंध चांगले राहिले नाहीत. आमच्या (राज्य) सरकारने कोरोना काळात कामगारांना उपाशी ठेवले नाही. मात्र, उत्तरप्रदेशमध्ये जे कामगार गेले त्याच्या सोबत गैरवर्तन करण्यात आले. हे सर्व आपण पाहिले आहे. भाजपाच्या नेत्यांनी हॉटेल, क्लब बनवले. तर, काँग्रेसनी शाळा आणि महाविद्यालये बनवली. आता १०-१० रुपये घेऊन राम मंदिर बांधले जात आहे. सरकार तर भाजपाचेच आहे, मग पैशाची कमी कसली? असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला.

माजी आमदारांवर केली टीका -

त्यांनी माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. शहरातील प्रसिद्ध टॉवेलवाले बाबा अशी उपमा त्यांनी माजी आमदारांना दिली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, राज्य प्रभारी राजेश शर्मा, मेहुल वोरा, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, युवाअध्यक्ष दीप काकडे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात मुंबई आयुक्तांचे कौतुक करत नाव न घेता अस्लम शेख यांना टोला हाणला होता. त्यावर अस्लम शेख म्हणाले की, मी दोन आयुक्तांची मागणी केली आहे. त्यावर मी ठाम आहे. सध्याची परिस्थिती पाहता आपण ही मागणी केली आहे, असे अस्लम शेख म्हणाले.

Last Updated : Jan 12, 2021, 8:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.