ठाणे : मुंबई - नाशिक महामार्गवरील वडपे नाक्यावर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक होऊन ९ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली ( Accident On Mumbai Nashik Highway ) आहे. जखमी पैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक ( 5 People Are In Critical Condition ) असून, त्यांना ठाणे आणि मुंबई रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. या अपघाताची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात ( Bhiwandi Taluka Police Station ) करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दुचाकी, कार आणि रिक्षाची झाली धडक
भिवंडी तालुक्यातील मुंबई - नाशिक महामार्गवरील वडपे नाक्यावर आज सकाळच्या सुमारास भरधाव दुचाकी, कार आणि रिक्षामध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्याच्या कडेला उडून पडले होते. तर रिक्षा व कारमधील काही प्रवासी वाहनांतून फेकले गेले. तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ९ गंभीर जखमीपैकी ४ जखमींना भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात ( Indira Gandhi Hospital Bhiwandi ) दाखल करण्यात आले आहे.
५ जणांची प्रकृती चिंताजनक
५ जणांची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी मुंबई व ठाणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. भिवंडी तालुका पोलिसांनी अपघाताची नोंद करून जखमींची नावे व पत्ते घेण्याची माहिती सुरु असल्याचे सांगतिले आहे. त्यामुळे जखमींची नावे समजू शकली नाही.