ठाणे : ठाण्यात वाढत्या काँक्रिटीकरणाचा फटका जंगलात राहणाऱ्या वन्य प्राण्यांवर होत आहे. मानवी वस्त्यांनी जंगलावर अतिक्रमण केल्याने आता वन्य प्राणी हे मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव करताना दिसत आहेत. यापूर्वी राष्ट्रीय उद्यानाच्या लागत असलेल्या गृहसंकुलात आणि वस्त्यांमध्ये, पाड्यांमध्ये बिबट्या सारख्या वन्यप्राण्यांचा शिरकाव झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. दरम्यान, ठाण्यात एका वानरांचा अनेक दिवसापासून विविध भागात वावर असलायची माहिती ठाणेकरांनी दिली. वन्यप्राणी वानर याला पाहून बच्चे कंपनी ही कुतूहलाने पाहत आहे. तर नागरिक मात्र वानर हल्ला करण्याच्या भीतीने वाट वाकडी करून जाताना दिसत आहेत.
यापूर्वी वानरांचा वावर हा लुईसवाडी परिसरात होता : वानराला नागरिकांनी चक्क कचराळी तलावाच्या कठ्याड्यावर पहिले. यामुळे जॉगिंग ट्रॅकवर वॉक करणारे वाट वाकडी करीत मार्गक्रमण करीत होते. त्यानंतर गुरुवारी हे वानर चक्क महापालिकेच्या मुख्यालयाच्या समोरील रस्त्यावर भर रस्त्यात कडेला ठिय्या मारून बसलेले आढळले. त्यामुळे रस्त्याने वाहनावरून प्रवास करणारे नागरिक वाट वाकडी करून दुचाकी घेऊन जाताना दिसले. काही काळाने वानर हे निघून गेले.
येवुर परिसर जवळील नागरिक हैराण : शहरात खायला मिळणारे अन्न पदार्थ आता या माकडांना आवडू लागले आहे, त्यांना खायला देणारे नागरिक ही मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ देत असल्यामुळे आता या माकडांचा वावर शहरात वाढला आहे. जंगलात मिळणारे नैसर्गिक खाद्य आता या माकडांना नको. कारण त्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत आता माकड करत नाही त्यामुळे शहरात या माकडांचा वावर वाढू लागला आहे.
साहित्य पळवापळवी सुरूच : या माकडांकडून नागरिकांच्या वस्तू मोबाईल घरातील साहित्य पळवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे नागरिक आता दरवाजे खिडक्या बंद ठेवून घरात बसत आहेत.या प्रकाराला रोखण्यासाठी पालिकेची कोणतीही यंत्रणा नाही सामाजिक संस्थेच्या मदतीनेच या माकडांचा बंदोबस्त करावा लागत आहे. ठाण्यातील डायघर भागात एका माकडाने एका महिन्याच्या बालकावर हल्ला केल्याची घटना काही महिन्यापूर्वी झाली होती अशा घटनांमुळे नागरिकांच्या मनात दहशत निर्माण होत आहे.हे प्रकार रोखले तरच नागरिक सुरक्षित राहू शकतात असे नागरिकांनी सांगितले आहे.