ETV Bharat / state

जमील शेख हत्या प्रकरण : अंत्यसंस्कारात जनसागर, हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट

मनसे पदाधिकारी मृत जमील शेख याची हत्या होऊन दोन दिवसांपेक्षा अधिक काळ उलटला. ठाणे पोलिसांना हत्या करणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहेत. मात्र, आरोपी अद्याप पोलिसांच्या कक्षेबाहेर आहेत. बुधवारी दुपारी जमील शेख याच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

mns member jamil shaikh funeral thane
जमील शेख हत्या प्रकरण : अंत्यसंस्कारात जनसागर
author img

By

Published : Nov 25, 2020, 8:05 PM IST

ठाणे - सोमवारी हत्या झालेल्या जमील शेखवर आज (बुधवारी) अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राबोडीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. सोमवारी दुपारी भर रस्त्यात गोळी डोक्यात घालून करण्यात आलेल्या जमील शेख हत्या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. अद्याप आरोपी परागंदा आहे. तसेच हत्येचे कारणही अस्पष्ट आहे.

मनसे पदाधिकारी मृत जमील शेख याची हत्या होऊन दोन दिवसांपेक्षा अधिक काळ उलटला. ठाणे पोलिसांना हत्या करणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहेत. मात्र, आरोपी अद्याप पोलिसांच्या कक्षेबाहेर आहेत. बुधवारी दुपारी जमील शेख याच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत तब्बल १० हजाराच्या आसपास राबोडीवासी सहभाग झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणातील गर्दीमुळे वाहतुक ठप्प झाली होती. दरम्यान, आरोपी मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे भूमिका जमीलच्या कुटुंबीयांनी घेतली होती. मात्र, कुटुंबियांशी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि मनसे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.

फिजिकल डिस्टन्सिंगची ऐशी-तैशी -
मृत जमील शेख याच्या अंत्यसंस्कारासाठी राबोडी परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने मोठी गर्दी झाली होती. तसेच वाहतुकीचा चक्काही जाम झाला. तर तुफान गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसले. दहा हजाराच्या आसपास नागरिक रस्त्यावर होते.

हेही वाचा - माहूर पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी फरार! बलात्कार प्रकरणात झाली होती अटक

पोलिसांची धरपकड सुरू -

राबोडीतील हत्या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांसह गुन्हे शाखा, खंडनी पथक करत आहेत. तर संशयितांना ताब्यात घेण्यात येत आहे. तर हत्येनंतर सुस्पष्ट दिसणारे सीसीटीव्हीचे फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे.

याबाबत प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया -

समाजसेवक व मनसे कार्यकर्ते जमील शेख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करून खऱ्या सूत्रधारांना गजाआड करावे, अशी विनंती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना केली आहे. ठाण्यात कायदा सुव्यवस्थेबरोबरच शांतता कायम राहावी, यासाठी त्यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याची विनंती केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खऱ्या सूत्रधारांना गजाआड करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.