ETV Bharat / state

MNS Human chain protest: टोलवाढी विरोधात मनसे पुन्हा आक्रमक; मुलुंड टोल नाका येथे मानवी साखळी आंदोलन - मुलुंड टोल नाका येथे मानवी साखळी आंदोलन

MNS Human chain protest: टोलनाक्यांवर उद्यापासून (Thane MNS) होणाऱ्या टोलवाढी विरोधात (toll rate hike) महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसेचे (Maharashtra Navnirman Sena) ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज (शनिवारी) पक्षातर्फे मुंबईच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर (Anand Nagar toll booth in Thane) टोलनाक्यावर मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. (MNS agitation on toll booths)

MNS Human chain protest
मानवी साखळी आंदोलन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 11:09 PM IST

ठाणे MNS Human chain protest : महाराष्ट्रात टोलधाडी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली असून अनेकदा टोल नाक्यांवर तोडफोड देखील करण्यात आली. आता पुन्हा एकदा टोल नाक्यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली असून त्याला कारण आहे उद्यापासून होणारी टोल दरवाढ. उद्यापासून टोल नाक्यांवर 5 ते 30 रुपये पर्यंत दरवाढ होणार आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे. ठाण्यातून मुंबई आणि इतरत्र जाणाऱ्या वाहन चालकांना यामुळे जादा पैसे मोजावे लागणार आहेत. ज्यामुळे वाहन चालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. ही जाचक टोल दरवाढ त्वरित मागे घ्यावी यासाठी मनसेने आज ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मानवी साखळी आंदोलन घेतले. या साखळी आंदोलनात मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. उद्यापासून होणारी टोल दरवाढ मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले.

पाच वर्षांआधीच टोलनाके बंद होणे अपेक्षित होते: अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने सुरू असलेल्या आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. १९९७ साली सुरू झालेले टोल २०२६ ला बंद होणार अशी घोषणा राज्य सरकारने केली होती; परंतु गाड्यांची संख्या वाढत आहे. पाच वर्ष आधीच टोल नाके बंद झाला हवे होते, असे अविनाश जाधव यांनी सांगितले. आम्ही विरोधक असून चुकीच्या निर्णयांचा विरोध करणारच. तेव्हा सरकारने आम्हाला शांततेने आंदोलन करू द्यावे व आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका, असा धमकीवजा इशारा देखील अविनाश जाधव यांनी दिला. टोल नाक्यांवर होणाऱ्या अन्यायकारक टोलवाढी विरोधात शांततापूर्ण मानवी साखळी आंदोलन सुरू करण्यात आले असून यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सामील झाले होते, असे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले.

सत्ताधाऱ्यांना करून दिली आठवण: आता महाराष्ट्र सरकारच्या सत्तेत असलेले आमदार यास टोलनाक्यांवर दगड मारून शपथ घेण्यासाठी गेलेले होते. या शपथविधीलाही एक दशक पूर्ण झाले असून अजूनही ठाण्याची सुटका या टोलनाक्यातून झालेली नाही. म्हणूनच आता सत्ता असताना तरी ठाण्याला या टोलधाडी पासून वाचवा असे आवाहन मनसेकडून करण्यात आलेले आहे.

हेही वाचा:

  1. Fadnavis On Maratha Reservation : मराठा, ओबीसी समाजात भांडणे लावण्याची सरकारची भूमिका नाही; देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
  2. Ashish Shelar Criticizes Aditya Thackeray : बाप आजारी असताना सरकारी पैशावर परदेशात मजा मारणार्‍याने शहाणपण शिकवू नये - आशिष शेलार
  3. Aaditya Thackeray On CM : मुख्यमंत्री फक्त सुट्टी घालवण्यासाठी विदेश दौऱ्यावर; आदित्य ठाकरेंची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.