नवी मुंबई : राज्यातील धार्मिक वातारण अजूनही अशांत आहे. पनवेल रेल्वे स्टेशनमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पनवेल रेल्वे स्थानकामध्ये चक्क प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या ठिकाणी काही मुस्लिम व्यक्ती नमाज पढत आहेत. नमाज पढण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रकारामुळे आता चांगलीच आक्रमक झाली आहे. तसेच येथे त्या प्रकरणावरून चांगलेच वातावरण तापले आहे. मनसे त्या कृतीविरोधात पनवेल रेल्वे स्टेशनवर महाआरती करणार आहे.
पनवेल रेल्वे स्थानकामध्ये महाआरती : स्टेशनमध्ये अशी कृती होत असल्याने कुठेतरी धार्मिक वातावरण गढूळ होत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. मनसेचे प्रवक्ते पनवेल महानगराचे शहरअध्यक्ष योगेश चिले यांनी ७ जुलैला दुपारी एक व्हिडिओ प्रसारित करून त्यात म्हटले या देशात सर्वधर्मसमभाव आहे, हे सिद्ध करण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकामध्ये यावे. रेल्वे स्थानकावर जर नमाज चालतो, तर महाआरतीसुद्धा नक्की चालणार. त्यामुळे सर्व हिंदू बांधवानी पनवेल रेल्वे स्थानकामध्ये महाआरतीसाठी उपस्थित राहावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
पोलीस आणि रेल्वे अधिकारी यांची घेतली भेट : या नमाज प्रकरणानंतर पोलीस आणि रेल्वे अधिकारी यांनी मनसे आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या पदाधिकार्यासह बैठक घेतली. तसेच यापुढे असा प्रकार रेल्वे स्थानक परिसरात व सार्वजनिक ठिकाणी होणार नाही असे आश्वासन दिले. त्याशिवाय पनवेल रेल्वे स्थानकामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असेही रेल्वे अधिकार्यांनी सांगितले. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाआरतीचे केलेले नियोजन रद्द केले. मात्र यापुढे असे कुठलेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि जशास तसे उत्तर देण्यात येईल, असे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा :
- Namaj Pathan In School : मुंबईतील शाळेत विद्यार्थ्यांना शिकवलं जातय नमाज पठण, ट्रस्टीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
- Attack on Namazis in Haryana : हरियाणात नमाज अदा करणाऱ्यांवर हल्ला, अनेक जण जखमी, गावात पोलीस बंदोबस्त तैनात
- MP Mazar Controversy: मध्यप्रदेशातील आणखी एका सरकारी शाळेत सापडली मजार.. शुक्रवारी पढतात नमाज