ठाणे - भोंदूबाबाने भुताची भीती दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुझ्या मृत झालेल्या काकाचे भूत तुझ्या मानगुटीवर बसले आहे. त्यामुळे पूजापाठ आणि तंत्रमंत्र विद्याकरून हे भूत काढले तरच तुझी दुखत असलेली मान ठीक होईल. असा बहाणा करून अल्पवयीन मुलीला जंगलात नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचार व पोक्सो कायद्यांतर्गतसह महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष व अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत.
शांताराम जिवड्या शेळके (वय ६१, रा. बोलबाव गाव, भिवंडी) असे अत्याचार केल्याप्रकरणी अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. तर या गुन्ह्यातील भोंदूबाबाला मदत केल्याप्रकरणी पीडितेची आई (वय ३४) व आईचा साथीदार (वय ३५) या दोघांनाही अटक केली आहे.
दोन वर्षांपासून पीडितेला मानेचा त्रास -
पीडित मुलगी भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबासह राहत असून दोन वर्षांपूर्वी तिच्या काकाचे निधन झाले. तेव्हापासून पीडित मुलीची मान वाकडी होऊन दुखत होती. त्यामुळे पीडितेच्या आईने तिच्यावर दोन रुग्णालयात उपचार केले. मात्र मानेचा त्रास कमी होत नव्हता. त्यामुळे पीडितेच्या आईचा साथीदार उमेश हा पीडितेच्या घरी येऊन सांगत होता कि, माझ्या ओळखीचा एक तांत्रिक बाबा आहे. तो पूजापाठ करून मान ठीक करून देईल. यावर पीडितेच्या आईनेही तिला भोंदूबाबाकडे जाताना सांगितले कि, मी या बाबाकडे पूर्वी गेले होती. तो अंगावरील कपडे काढण्यास सांगून तंत्रमंत्र करून तुझी मान ठीक करून देईल. असे पीडितेला तिच्या आईने सांगितले. त्यामुळे आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित मुलगी आरोपी उमेश सोबत जुलै २०२० रोजी दुचाकीवरून तांत्रिक भोंदू बाबाकडे गेली होती.
हे ही वाचा - सुरक्षा पुरवू शकत नसल्याने कोल्हापुरात न येण्याची सोमैया यांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस
पूजापाठ करण्याच्या बहाण्याने नेले जंगलात -
भोंदूबाबाच्या घरी गेल्यावर त्याने पीडित मुलीला सांगितले कि, मृत झालेल्या तुझ्या काकाचे भूत तुझ्या मानगुटीवर बसले आहे. त्यामुळे पूजापाठ आणि तंत्रमंत्र विद्याकरून हे भूत काढला तरच तुझी दुखत असलेली मान ठीक होईल. असा बहाणा करून अल्पवयीन मुलीला गावानजीक असलेल्या जंगलात रात्रीच्या सुमारास नेले. त्यावेळी जंगलात पोहचताच आरोपी उमेशला भोंदूबाबाने रस्त्यावरच थांबवून पीडितेला तो जंगलातील एका झाडाखाली घेऊन गेला. तांत्रिकाने हळद-कुंकू, गुलाल, अबीर, सेंदूर , लिंबू, टायपिन पाकीट पूजापाठ करण्यासाठी आणले होते. हे साहित्य जमिनीवर ठेवून तांत्रिकाने मुलीला सांगितले की, तुझी आरती करायची असल्याने अंगावरील कपडे काढ. त्यानंतर पीडितेने अंगावरील कपडे काढताच नराधम भोंदूबाबाने तिच्यावर बलात्कार केला. तर या घटनेची कुठेही वाच्यता करायची नाही, असे पीडितेच्या आईने व आरोपी उमेशने तिला सांगितले. दुसरीकडे तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराने पीडिता मानसिक दबावाखाली होती.
पीडितेच्या काकीमुळे घटना आली समोर; तिन्ही आरोपी कोठडीत -
पीडितेची काकू शेजारी राहत असून त्यांच्या घरी गणपतीचे विसर्जन असल्याने पीडिता गेली होती. त्यावेळी पीडिता रडत असल्याचे व मानसिक दबावात असल्याचे पाहून तिच्याकडे काकूनी विचारपूस केली. त्यावेशी पीडितेने काकूला तिच्यावर घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनतर तातडीने पीडितेला घेऊन काकूने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन पीडितेवर घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या तक्रारीवरून नराधम भोंदूबाबावर अत्याचारासह पोक्सो कायदा तसेच महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष व अघोरी प्रथा व जादू टोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून नारपोली पोलिसांनी भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. तर गुन्ह्यात नराधमाला मदत करणारी पीडितेची आई व तिच्या साथीदारालाही अटक केली आहे. सध्या तिघेही आरोपी पोलीस कोठडीत आहेत.