ETV Bharat / state

'मातृछाया'चे ग्रहण सुटले....बारा दिवसांच्या उपोषणानंतर मिळाले रस्त्याचे आश्वासन - thane

या आंदोलनाची दखल घेत महापालिका प्रशासनाने गेल्या दोन दिवसात सदर पोहोच मार्गाचे काम पूर्ण केले. आज महापालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता हंसाटे यांनी सदर कामाबाबत उपोषणकर्त्यांना लेखी पत्र दिले.  त्यानंतर मोसंबीचा ज्यूस देऊन उपोषण सोडण्यात आले.

पालिकेच्या आश्वासनानंतर उपोषण सोडले
author img

By

Published : Jun 2, 2019, 3:25 AM IST

ठाणे - पोहोच मार्गाचे अर्धवट केलेले बांधकाम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी कल्याण पूर्वेतील 'मातृछाया' कॉलनीच्या रहिवाशांनी महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर साखळी उपोषण व बेमुदत उपोषण सुरु केले होते. या पोहोच मार्गाचे काम महापालिकेने गेल्या दोन दिवसात पूर्ण केल्याने हे उपोषण शनिवारी महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थित मागे घेण्यात आले.

काटेमानिवली भागातील मातृछाया कॉलनीच्या आजूबाजूला वस्ती वाढल्याने या कॉलनीतील रहिवाशांचा मुख्य रस्त्यावर येण्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद झाला होता. त्यामुळे रहिवाशांच्या मागणीनुसार महापालिकेने गटारावरुन पोहोच मार्ग बनविण्याचे काम सुरु केले. मात्र अन्य रहिवाशांनी त्याला हरकत घेतल्याचे कारण देत ते बंद करण्यात आले. हे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करूनही त्याला महापालिका प्रशासन दाद लागून देत नव्हते.

अखेरीस मातृछाया कॉलनीतील रहिवाशांनी आम आदमी पार्टीच्या पुढाकाराने महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर गेल्या मंगळवारपासून साखळी उपोषण सुरु केले होते. दरम्यान, उपोषण तीव्र करीत उपोषणकर्त्यांनी महापालिका प्रशासनाचे श्राद्ध घालत मुंडण केले. तसेच गौतम कांबळे या रहिवाशाने बुधवारपासून आमरण उपोषण सुरु केले.

अखेरीस या आंदोलनाची दखल घेत महापालिका प्रशासनाने गेल्या दोन दिवसात सदर पोहोच मार्गाचे काम पूर्ण केले. आज महापालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता हंसाटे यांनी सदर कामाबाबत उपोषणकर्त्यांना लेखी पत्र दिले. त्यानंतर मोसंबीचा ज्यूस देऊन उपोषण सोडण्यात आले.

याप्रसंगी आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभा अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी महापालिका प्रशासनाने नागरिकांप्रती संवेदनशील राहून लहानसहान समस्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहावे, असे सांगत महापालिका प्रशासन व आंदोलनाला समर्थन देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार व शिवसेनेच्या उपशहर प्रमुखासह अनेक मान्यवरांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट देत रहिवाशांच्या मागणीला पाठींबा दर्शविला होता.

मातृछायाचे ग्रहण सुटले; कॉलनीसाठी महापालिकेने पोहोच रस्ता दिला बांधून, बारा दिवस चाललेले उपोषण मागे

ठाणे : पोहोच मार्गाचे अर्धवट केलेले बांधकाम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी कल्याण पूर्वेतील मातृछाया कॉलनीच्या रहिवाशांनी महापालिकेच्या ’ प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर साखळी उपोषण व आमरण उपोषण सुरु केले होते. सदर पोहोच मार्गाचे काम महापालिकेने गेल्या दोन दिवसात पूर्ण केल्याने हे उपोषण शनिवारी महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थित मागे घेण्यात आले.

काटेमानिवली भागातील मातृछाया कॉलनीच्या आजूबाजूला वस्ती वाढल्याने या कॉलनीतील रहिवाशांचा मुख्य रस्त्यावर येण्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद झाला होता. त्यामुळे रहिवाशांच्या मागणीनुसार महापालिकेने गटारावरुन पोहोच मार्ग बनविण्याचे काम सुरु केले, मात्र अन्य रहिवाशांनी त्याला हरकत घेतल्याचे कारण देत ते बंद करण्यात आले. सदरचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करूनही त्याला महापालिका प्रशासन दाद लागून देत नव्हते. अखेरीस मातृछाया कॉलनीतील रहिवाशांनी आम आदमी पार्टीच्या पुढाकाराने महापालिकेच्या ‘’ प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर गेल्या मंगळवारपासून साखळी उपोषण सुरु केले होते. दरम्यान, उपोषण तीव्र करीत उपोषणकर्त्यांनी महापालिका प्रशासनाचे श्राद्ध घालत मुंडण केले, तसेच गौतम कांबळे या रहिवाशाने बुधवारपासून आमरण उपोषण सुरु केले.

अखेरीस या आंदोलनाची दखल घेत महापालिका प्रशासनाने गेल्या दोन दिवसात सदर पोहोच मार्गाचे काम पूर्ण केले. आज महापालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता हंसाटे यांनी सदर कामाबाबत उपोषणकर्त्यांना लेखी पत्र दिले व त्यानंतर मोसंबीचा ज्यूस देऊन सदरचे उपोषण सोडण्यात आले. याप्रसंगी आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभा अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी महापालिका प्रशासनाने नागरिकांप्रती संवेदनशील राहून लहानसहान समस्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहावे, असे सांगत महापालिका प्रशासन व आंदोलनाला समर्थन देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार व शिवसेनेच्या उपशहरप्रमुखासह अनेक मान्यवरांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट देत रहिवाशांच्या मागणीला पाठींबा दर्शविला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.