ETV Bharat / state

लॉकडाऊन ईफेक्ट : नवी मुंबईत लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगोंचा मुक्त संचार

author img

By

Published : May 5, 2020, 7:52 PM IST

Updated : May 5, 2020, 8:54 PM IST

मूळचा परदेशी असलेला मात्र कच्छमध्ये स्थिरावलेल्या फ्लेमिंगो पक्षांमुळे नवी मुंबईतील, ऐरोली व सिवूडस एनआरआय कॉम्प्लेक्सच्या खाडी किनारी असलेल्या होल्डिंग पौंडवर गुलाबी चादर परसलेली पाहायला मिळत आहे.

flamingos
नवी मुंबईत लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगोंचा मुक्त संचार

नवी मुंबई - 'लॉकडाऊन'मुळे नवी मुंबईच्या खाडी किनारी फ्लेमिंगोचा मोठ्या प्रमाणात मुक्त संचार पाहायला मिळत आहे. जगभरात सध्या लॉकडाऊनमुळे पर्यावरणाला नवं संजीवनी प्राप्त झालेली पाहायला मिळतं आहे. त्याचे सुखद परिणाम नवी मुंबईतही दिसत आहेत. पूरक पोषक व सकारात्मक गोष्टींमुळे नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्षांची संख्या दुप्पट तिप्पट वाढली आहे.

फ्लेमिंगोंचा मुक्त संचार

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वाढलेल्या फ्लेमिंगोची संख्या अजूनही टिकून आहे. मूळचा परदेशी असलेला मात्र कच्छमध्ये स्थिरावलेल्या फ्लेमिंगो पक्षांमुळे नवी मुंबईतील, ऐरोली व सिवूडस एनआरआय कॉम्प्लेक्सच्या खाडी किनारी असलेल्या होल्डिंग पौंडवर गुलाबी चादर परसलेली पाहायला मिळत आहे.

  • महाराष्ट्रात येथे येतात फ्लेमिंगो -

फ्लेमिंगो जून, जुलै व सप्टेंबर महिन्यात कच्छमध्ये आढळतात. मात्र, विणीचा हंगाम आटोपला की, नवी मुंबई परिसरात येतात. 10 महिने, मुंबई शिवडी, ठाणे व नवी मुंबईत त्यांचा अधिवास असतो. इतर वेळी नवी मुंबईत फ्लेमिंगो पाहायला जरी मिळाले असतील तरी त्याचे प्रमाण मात्र तुरळक असते. मात्र, सध्या हे फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईत मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत.

  • नवी मुंबईत फ्लेमिंगोचे खाद्य -

लॉकडाऊनमुळे ध्वनि प्रदूषण, वायू प्रदूषण तसेच खाडी किनारी माणसांचा वावर नसल्याने हे वातावरण फ्लेमिंगोसाठी पूरक आहे. गुलाबी रंगाची छटा असलेले पंख, लालबुंद चोच, लांबसडक मान व उंच असणारे पाय असे मोहक रूप असल्यामुळे त्यांना अग्निपंख असेही संबोधले जात असल्याची माहिती पक्षी मित्रांनी दिली आहे. सागरी जीव, शेवाळे खारफुटीमध्ये वाढणाऱ्या काही वनस्पती हे फ्लेमिंगोचे खाद्य आहे. नवी मुंबईत ते पूरक पोषक असल्याने फ्लेमिंगो दरवर्षी अन्नाच्या शोधत त्यांची भूक भागवण्यासाठी नवी मुंबईत येतात.

Last Updated : May 5, 2020, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.