ETV Bharat / state

लाखोंच्या घरफोड्या करूनही 'गब्बर' भिकारीच; पुन्हा अडकला पोलिसांच्या जाळ्यात - thane latest news

घरफोड्या करणाऱ्या टोळीला कोनगाव पोलीसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल तसेच टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

kongaon-police-arrest-thief-gang-in-thane
ठाणे : घरफोडी करणारी टोळी कोनगाव पोलिसांच्या ताब्यात
author img

By

Published : Dec 4, 2020, 9:44 PM IST

Updated : Dec 5, 2020, 8:10 AM IST

ठाणे - लाखोंच्या घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात सहभाग असलेल्या 'गब्बर' नावाचा सराईताला अटक करण्यात आले होते. त्याने आपल्या दोन साथीदारांसह भिवंडी तालुक्यातील भूमी इंडस्ट्रियल मधील कृष्णा फॅब्रीक्सच्या गोदामातून ७ लाख ६८ हजार रुपयांचे सोफ्याकरिता लागणारे कापडाचे वेगवेगळ्या कंपनीचे रोल एका टेम्पोत भरून लंपास केले होते. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी गब्बर उर्फ अजय हरिजन (वय, ३५, रा. एरोली, नवीमुंबई ) मोहम्मद इरफान जैनुलआबिदिन शेख (वय, २७,रा, वडाळा मुंबई) संतोष खरात (वय, ३८, रा. एरोली, नवीमुंबई ) असे लाखोंच्या घरफोडी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या आरोपी त्रिकूटाकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमालासह टेम्पो जप्त करण्यात आला आहे. तर अनेक लाखोंच्या घरफोड्या करूनही 'गब्बर' भिकारीच राहिल्याने तो पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

योगेश चव्हाण यांची प्रतिक्रिया

सीसीटीव्ही फुटजेमुळे 'गब्बर' पोलिसांच्या जाळ्यात ...

घरफोडीचे गंभीर स्वरूप पाहता सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढाले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अभिजित पाटील, नितीन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक जे. आर. शेरखाने , यांच्यासह पोलीस पथकाने तपासला गती देत, चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक टेम्पो त्या दिवशी जाताना दिसला , या टेम्पोच्या नंबरवरून पोलीस घरफोड्या 'गब्बर' व त्याच्या साथीदारांपर्यत पोचवली आणि त्याला बेड्या ठोकल्या.

काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटला होता 'गब्बर' -

या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेला गब्बर नावाचा आरोपी काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटला होता. त्यांनतर त्याने पुन्हा घरफोडी करण्यासाठी दोन साथीदारांसह कट रचला. त्यानुसार २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कृष्णा फॅब्रीक्सच्या गोदामात साठवलेले महागडे सामान या टोळीने लंपास केले. विशेष म्हणजे गब्बर हा घरफोडीतील सराईत गुन्हेगार असून तो मूळचा उत्तरप्रदेशच्या बनरसचा रहिवाशी आहे. त्याच्यावर अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती भिवंडी पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - बांगलादेशकडून रोहिंगे मुस्लिमांना निर्जन बेटांवर पाठविण्यास सुरुवात

Last Updated : Dec 5, 2020, 8:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.