ठाणे : कल्यानमधील नोकराने मालकाने दिलेली रक्कम लांबल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कमलेश ज्वेलर्सच्या मालकाने नोकराकडे 45 लाखांची रक्कम बॅंकेत जमा करण्यासाठी दिली होती. मात्र, एव्हढी रक्कम पाहुन नोकराची नियत फिरल्याने त्यांने 45 लाख 15 हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी पळून गेलेल्या नोकराला राजस्थानमधून बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच लंपास केलेली रक्कम त्याच्याकडून जमा करण्यात आली आहे.
45 लाख केले पसार : कल्याण येथील कमलेश ज्वेलर्सच्या मालकाने त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या रमेश देवासी यांना 45 लाख 15 हजार रुपये रोख दिले होते. एवढी मोठी रक्कम पाहून रमेशचे नशीबच पालटले. बराच वेळ होऊनही रमेश परत न आल्याने सोनाराला संशय आला. त्यांनी रमेशचा शोध सुरू केला. परंतु, रमेशने बँकेतही पैसे भरले नसल्याचे निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ज्वेलर्सनी कल्याण महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार केली.
41 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमालह जप्त : या प्रकरणी डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने-पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे त्यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास केला. तपासासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. तपासादरम्यान पोलिसांची दोन पथके राजस्थान, गुजरातला पाठवण्यात आली होती. अखेर राजस्थान येथील जगदीश देवासी याला पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून 41 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमालह जप्त करण्यात आला, तर मुख्य आरोपी रमेश देवासी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सराईत चोराकडून 6.24 लाख जप्त : अन्य एका प्रकरणात याच पोलिसांनी जावेद अख्तर, मोहम्मद सलीम शहा (27, रा. शांतीनगर भिवंडी) या चोरट्याला जेरबंद केले आहे. 21 मार्च रोजी कल्याणमध्ये एका 65 वर्षीय महिलेचे घर फोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने, एक मोबाईल फोन, एलईडी टीव्ही, रोख रक्कम असा 5 लाख 79 हजार 505 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि खासगी गुप्तहेरांकडून माहिती गोळा केल्यानंतर जावेद शाहला भिवंडीतून ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीत चोरट्याने कल्याणच्या रामबागेत दोन घरे फोडल्याची कबुली दिली आहे. या चोरट्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन, एलईडी टीव्ही, रोख 6 लाख 24 हजार 355 रुपये असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - MP Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांच्या जन्मतारखा दोन असल्याचा ठाकरे गटाचा आरोप