ETV Bharat / state

Thane : शहापुरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न प्रलंबित, आमरण उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली - उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

आज २५ वर्षे उलटून देखील शहापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न प्रलंबित आहे. स्मारक व्हावं यासाठी उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्न प्रलंबित

author img

By

Published : Dec 3, 2022, 7:07 PM IST

ठाणे : शहापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकसाठी गेल्या 25 वर्षांपासून शहापूर तालुक्यातील आंबेडकर अनुयायी शासनाकडे पत्र व्यवहार करून अंदोलन करत आहेत. परंतु शासन यावर नेहमी दुर्लक्ष करत असल्याने आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याच्या निषेधार्थ रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योतीताई गायकवाड यांचे आमरण उपोषण सुरु असून त्यांची प्रकृती आज खालावली आहे. मात्र, २४ तास उलटूनही शासनाचा एकही अधिकारी उपोषण स्थळी फिरकला नसल्याने सोमवारी ५ डिसेंबर रोजी शहापूर बंदची हाक रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने दिल्याने आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेंबाच्या स्मारकसाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्न प्रलंबित

25 वर्षांची मागणी : शहापूर शहरात डॉ बाबासाहेब आंबडेकर चौक असून या चौकात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास शासनाकडे तब्बल पंचवीस वर्षे पत्र व्यवहार करून विविध मार्गाने अंदोलन करण्यात येत आहे. मात्र, शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यास परवानगी का देत नाही ? हा प्रश्न संपूर्ण डॉ. आंबडेकर जनतेला पडला असून समाजाला अस्वस्थ करत आहे. आता मात्र, रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेकडून आमरण उपोषण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्ध पुतळा स्थापनेची मागणी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे शहापूर न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका दाव्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांच्या पदपर्शाने पुण्य झालेल्या शहापूर शहरात त्यांची कीर्ती म्हणून स्मारक करण्याची मागणी गेल्या २५ वर्षापासून होत आहे. दुसरीकडे शहापूर तालुका जिल्ह्यातील सर्वात मोठा आदिवासी तालुका म्हणून शासन दरबारी नोंद असून ज्या कोट्यवधी दलित आणि आदिवासी बांधवाना गुलामगिरीतून मुक्त केले त्याच शहापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्ध पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे स्थापन करण्याची मागणी करण्यात आली येत आहे. त्यासाठी कालपासून आमरण उपोषण सुरू कऱण्यात असून पुतळा उभारण्यास शासनाची परवानगी मिळत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान, दोन दिवसात उपोषण स्थळावर येऊन सर्वच राजकीय पक्षांसह ५० हुन अधिक दलित आदिवासी संघटनांनी रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योतीताई गायकवाड यांना स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी पाठींबा दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.