ठाणे - कल्याण पश्चिम भागातील एका सराफ दुकानदाराने भिशी योजनेच्या नावाने वाढीव व्याजाचे आमिष दाखवून दहा ग्राहकांना २८ लाख ९१ हजार ९०० रुपयांचा चुना लावून फरार झाले आहेत. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन सराफांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहितकुमार सोनी आणि श्रवणकुमार सोनी असे गुन्हा दाखल झालेल्या सराफांची नावे आहेत.
८७५ ग्राम सोन्याचे गुंतवले दागिने - तुकाराम पाटील हे सेवानिवृत्त अधिकारी असून त्यांनी आरोपी रोहितकुमार आणि श्रवणकुमार यांचेकडे गुंतवणूक केली . तसेच इतर ९ गुंतवणूकदारांनी देखील आरोपीकडे लाखो रुपयांचे दागिने ठेवून गुंतवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपीचे खडकपाडा भागात साई श्रद्धा ज्वेलर्स नावाने सोने चांदी विक्रीचे दुकान आहे. याच दुकानात आरोपी रोहित कुमार आणि श्रवणकुमार यांनी ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२२ या कालावधीसाठी आकर्षक व्याज देणारी भिशी योजना जाहीर केली होती. त्यावेळी त्यांच्या आकर्षक व्याजाच्या आमिषाला बळी पडून दहा ग्राहकांनी गुंतवणूक योजनेत एकूण ८७५ ग्राम सोन्याचे दागिने गुंतवले.
गुंतवणूकदारांनी लावला तगादा - त्यानंतर ११ महिने झाल्यावर गुंतवणूकदारांना आकर्षक व्याज मिळणे अपेक्षित होते. मात्र, ते न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी आपली मूळ ठेव परत देण्याचा तगादा ज्वेलर्सकडे लावला. वारंवार मागणी करूनही सराफ गुंतवणूकदारांच्या मागणीकडे लक्ष देत नव्हते. आपण ठेवलेल्या गुंतवणुकीचा सराफांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून अपहार करून दुकान बंद केल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात आज तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून महाराष्ट्र वित्तीय ठेवीदारांचे हीत कायद्यानुसार सराफांच्या विरुद्ध अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक रज्जाक शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत.
व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लावला २८ लाख ९१ हजार चुना
खडकपाडा भागात साई श्रद्धा ज्वेलर्स नावाने सोने चांदी विक्रीचे दुकान आहे. याच दुकानात आरोपी रोहित कुमार आणि श्रवणकुमार यांनी ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२२ या कालावधीसाठी आकर्षक व्याज देणारी भिशी योजना जाहीर केली होती. त्यावेळी त्यांच्या आकर्षक व्याजाच्या आमिषाला बळी पडून दहा ग्राहकांनी गुंतवणूक योजनेत एकूण ८७५ ग्राम सोन्याचे दागिने गुंतवले.