ठाणे - नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. मात्र, बोगस मतदारांची संख्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली. यासंदर्भात आयुक्तांना पत्रही देण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक पुढील महिन्यात होत आहेत. या निवडणुकीत 31 जानेवारी 2020 पर्यंत नोंदविलेली नावे ग्राह्य धरली जाणार आहेत. याची सुधारीत यादीही पालिकेच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आहे. मात्र, ही यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी राजकीय हस्तक्षेपाने नवी मुंबई मनपामधील काही अधिकारी यामध्ये फेरफार करून एका वॉर्डमधील व्यक्तीची नावे दुसऱ्या वॉर्डमध्ये स्थलांतरीत करीत असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केला आहे.
हेही वाचा - खळबळजनक ! 'कोरोना'च्या संशयातून दुबईतून परतलेल्या तरुणाला शेजाऱ्यांकडून मानसिक त्रास
या याद्या फेरफार करून पूर्वीसारख्या कराव्यात. या अनुषंगाचे पत्र त्यांनी मनपा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांना दिले. नवी मुंबईत 7 लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. मात्र, काही नागरिक इतरत्र राहूनही नवी मुंबईत मतदान करण्यासाठी येतात. अशा रहिवासी नसलेल्या बोगस मतदारांवर कारवाई करण्याचीही घरत यांनी मागणी केली आहे.