ETV Bharat / state

भिवंडीत अल्पवयीन मामेबहिणीवर बलात्कार, तर तरुणीशी जबरदस्तीने विवाह करून अत्याचार

पहिल्या घटनेत मामाच्या पाच वर्षीय मुलीला तुला काही तरी सांगायचे आहे अशी बतावणी करून तीला बिल्डिंगच्या जिन्याखाली नेवून आतेभावाने अमानुष अत्याचार केल्याची घटना सीतामडी बिल्डिंग, वळगाव येथे घडली आहे.

author img

By

Published : May 20, 2019, 7:32 PM IST

तरुणीशी जबरदस्तीने विवाह करून अत्याचार

ठाणे - भिवंडी शहर परिसरात महिला व मुलींच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या घटनेत मामाच्या पाच वर्षीय मुलीला तुला काही तरी सांगायचे आहे अशी बतावणी करून तीला बिल्डिंगच्या जिन्याखाली नेवून आतेभावाने अमानुष अत्याचार केल्याची घटना सीतामडी बिल्डिंग, वळगाव येथे घडली आहे.

या अत्याचार प्रकरणी भुपेंद्र उर्फ भोजू विजयप्रकाश दुबे (वय १६ ) व त्याची आई पुनमदेवी दुबे (३५ रा. सीतामडी बिल्डिंग, वळगांव) या दोघांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. अत्याचारी भुपेंद्र याने पाच वर्षीय मामाची मुलगी ही त्याच्या घरी आली असता, त्याने तिला राहत्या इमारतीच्या जिन्याखाली तुला काही तरी सांगायचे आहे. असे सांगून घेऊन गेला व तिच्यावर जबरी अत्याचार केला. पिडीत मुलगी सायंकाळी घरी आल्यावर तिला वेदना असह्य झाल्याने ती रडू लागली. त्यावेळी तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता झालेला प्रकार तिने आईला सांगितल्याने तिला या घटनेने धक्काच बसला.

या बाबत मुलीच्या आईने नणंदेला जाब विचारला असता, तिने या अक्षम्य घटनेकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन अत्याचारी भुपेंद्र व त्याची आई पुनमदेवी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच दोघेही मायलेक फरार झाले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लोंढे करीत आहे.
तर दुसऱ्या घटनेत फुलेनगर १ येथे राहणाऱ्या सोळा वर्षीय युवतीला फूस लावून बीड येथे पळवून नेवून तिच्याशी जबरदस्तीने लग्न करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अत्याचारी कुंदन बबन डोळस व त्याचे आई चिंदाबाई डोळस वडील बबन डोळस या तिघांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कुंदन डोळस याने फुलेनगर येथील नातेवाईकांकडे पाहूणे म्हणून येऊन शेजारच्या युवतीशी प्रेमसंबंध निर्माण केले व तिला फूस लावून मानखुर्द ,मुंबई येथे व त्यानंतर खडकी देवळा, बीड येथे नेवून आईवडिलांच्या मदतीने तिच्याशी जबरदस्तीने लग्न लावले. त्यानंतर तिला ऊसतोड कामासाठी जुंपून तिचे शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून अखेर युवतीने भिवंडी गाठून अत्याचारी कुंदन व त्याच्या आईवडिलांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून तपास अधिकारी एपीआय रोहिणी सोनार यांनी कुंदन यास अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यास २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भिवंडीत पाच वर्षीय मामाच्या मुलीवर  आतेभावाचा  अत्याचार तर दुसऱ्या घटनेत युवतीला पळवून नेवून बळजबरीने विवाह करून अत्याचार 

ठाणे :-  भिवंडी शहर परिसरात महिला व मुलींच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे.त्यामुळे वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या घटनेत मामाच्या पाच वर्षीय मुलीला तुला काही तरी सांगायचे आहे अशी बतावणी करून तीला बिल्डिंगच्या जिन्याखाली नेवून आतेभावाने अमानुष अत्याचार केल्याची घटना दुपारी सीतामडी बिल्डिंग, वळगांव येथे घडली आहे.

या अत्याचार प्रकरणी भुपेंद्र उर्फ भोजू विजयप्रकाश दुबे ( १६ ) व त्याची आई पुनमदेवी दुबे ( ३५ रा. सीतामडी बिल्डिंग ,वळगांव ) या दोघांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. अत्याचारी भुपेंद्र याने पाच वर्षीय मामाची मुलगी हि त्याच्या घरी आली असता त्याने तिला राहत्या इमारतीच्या जिन्याखाली तुला काही तरी सांगायचे आहे. असे  सांगून घेऊन गेला व तिच्यावर जबरी अत्याचार केला. पिडीत मुलगी सायंकाळी घरी आल्यावर तिला वेदना असह्य झाल्याने ती रडू लागली. त्यावेळी तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता झालेला प्रकार तिने आईला सांगितल्याने तिला या घटनेने धक्काच बसला.

या बाबत मुलीच्या आईने नणंदेला जाब विचारला असता तिने या अक्षम्य घटनेकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या आईने  नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन अत्याचारी भुपेंद्र व त्याची आई पुनमदेवी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच दोघेही मायलेक फरार झाले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लोंढे करीत आहे.

तर दुसऱ्या घटनेत फुलेनगर - १ येथे राहणाऱ्या सोळा वर्षीय युवतीला फूस लावून बीड येथे पळवून नेवून तिच्याशी जबरदस्तीने लग्न करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अत्याचारी कुंदन बबन डोळस व त्याचे आईवडील चिंदाबाई डोळस बबन डोळस या तिघांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कुंदन डोळस याने फुलेनगर येथील नातेवाईकांकडे पाहूणे म्हणून येऊन शेजारच्या युवतीशी प्रेमसंबंध निर्माण केले व तिला फूस लावून मानखुर्द ,मुंबई येथे व त्यानंतर खडकी देवळा ,बीड येथे नेवून आईवडिलांच्या मदतीने  तिच्याशी जबरदस्तीने लग्न लावले. त्यानंतर तिला ऊसतोड कामासाठी जुंपून तिचे शारीरिक व मानसिक छळ केला.या छळाला कंटाळून अखेर युवतीने भिवंडी गाठून अत्याचारी कुंदन व त्याच्या आईवडिलांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून तपास अधिकारी एपीआय रोहिणी सोनार यांनी कुंदन यास अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यास २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.     

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.