ETV Bharat / state

बलवान देश करायचा असेल तर प्रजेत चारित्र्य पाहिजे-मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 99 वर्षे पूर्ण होत आहेत. विजयादशमीच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत हे स्वयंसेवकांना संबोधित करत आहेत.

RSS Vijayadashami Utsav 2024
विजयादशमी (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2024, 9:22 AM IST

Updated : Oct 12, 2024, 1:02 PM IST

नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील मुख्यालयात विजयादशमी सण साजरा करण्यात येत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमात 'शस्त्रपूजा' केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पथसंचलन केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, " संघाचे शताब्दी वर्ष असल्याने हे महत्त्वाचे वर्ष आहे. अहिल्यादेवी होळकर यांचं स्मरण करतो. दयानंद स्वरस्वती यांचं 200 वे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. भारताच्या पुनरुत्थानमध्ये दयानंद सरस्वती यांचं महत्त्वाचं स्थान आहे. बलवान देश करायचा असेल तर प्रजेत चारित्र्य पाहिजे. सामाजिक आणि राष्ट्रीय चारित्र्य पाहिजे. बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या शोषण विरुद्ध जनजातीयमध्ये जागृती उत्पन्न केली. हे सगळे लोक आमच्या समोर मूर्तिमंत उदाहरण आहेत. तसे आम्ही व्हायला पाहिजे. या सगळ्यात देशहिताचा समान धागा होता. त्यांनी सामाजिक हितासाठी काम केलं. स्वतःसाठी काही ठेवले नाही. समाजात अशी शक्ती उभी राहिल्यावर देशाचे उत्थान होते. देशात राजकीय चारित्र्याची आवश्यकता आहे."

पाकिस्तानसोबत हात मिळवण्याची भाषा- मोहन भागवत यांनी देशाच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले, " बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत आहेत. त्यांना सर्वांच्या मदतीची गरज आहे. सरकारच्या मदतीची गरज आहे. हिंदू दुर्बल राहिले तर अत्याचार होणार आहेत. ज्या बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताचा हात आहे, त्याच बांगलादेशमध्ये पाकिस्तानसोबत हात मिळवण्याची भाषा होत आहे. भारतातही असे व्हावे, असे उद्योग सुरू आहेत. सांस्कृतिक परंपरेच्या विरोधात हे विचार जातात. संस्थांवर कब्जा करा, हे त्यांचे पाहिले पाऊल असते. त्या माध्यमातून विचारांना विकृत करतात. आपल्या लोकांविरोधात उभे करणे हे त्यांचे पहिले काम असते. विविधतचे नेरेशन देतात. इतक्या मोठ्या देशात सगळेच ठीक नसते. देशाच्या सीमावर्ती भागात अशा घटना वाढल्या आहेत."

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा (Source- ETV Bharat)

मुलांच्या मोबाईलवर नियंत्रणाची गरज- मोहन भागवत यांनी नव्या पिढीबाबत चिंता व्यक्त केली. मोहन भागवत म्हणाले, " राष्ट्रीय नेरेटिव्ह चालवावे लागेल. कायद्या अंतर्गत राहून आम्हाला समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचलावे लागतील. भारतात विचारांवर कुप्रभाव निर्माण होत आहे. मुलांच्या हातात मोबाईल आहे. काय पाहतात, यावर नियंत्रण नाही. घर कुटुंबात नियंत्रण स्थापन करावे लागेल. यासाठी कायदा बनवणे आवश्यक आहे. नशेमुळे पिढी वाहत चालली आहे."

गुंडागर्दी खपणार नाही- "संस्कार भ्रष्टाचारामुळे पंजाब, जम्मू,काश्मीर, बिहार, मणिपूर आणि केरळ अस्वस्थ्य आहे. जे चांगले वाटत नाही त्याचे लोकशाही रूपाने विरोध करता येतो. मात्र कायद्याच्या विरोधात विरोध करणाऱ्यांना गुंडागर्दीचा म्हणणे योग्य आहे. गणेश उत्सवात दगडफेक का होते? प्रशासन कधी कधी कारवाई करते. मात्र, गुंडागर्दी खपवून घेऊ नये. मी हे सगळे वर्णन कुणाला भीती दाखविण्यासाठी करत नाही," असे सरसंघचालक भागवत यांनी म्हटले.

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील विजयादशमीच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचे भाषण हे संघटनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण, या कार्यक्रमातून भविष्यातील राष्ट्रीय स्वयंसेवकाची योजना आणि व्हिजन सर्वांसमोर मांडतात. तसेच देशातील विविध मुद्द्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका मांडण्यात येते.
  • पद्मभूषण आणि इस्रोचे माजी प्रमुख के. राधाकृष्णन हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, एचसीएल प्रमुख शिव नाडर आणि बाल हक्क कार्यकर्ते, नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते.

सविस्तर माहिती थोड्याच वेळात

Last Updated : Oct 12, 2024, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.