ETV Bharat / entertainment

ऐश्वर्या रायकडून अफवांना पूर्णविराम, अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा - HAPPY BIRTHDAY BIG B

ऐश्वर्या राय बच्चननं सासरे आणि मेगास्टार असलेल्या अमिताभ बच्चनला वाढदिवसानिमित्त एक सुंदर पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy Birthday Big B
वाढदिवसाच्या शुभेच्छा बिग बी (अमिताभ बच्चन ऐश्वर्या राय आणि आराध्या (Instgram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 12, 2024, 10:46 AM IST

Updated : Oct 12, 2024, 2:49 PM IST

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं तिचे सासरे आणि अभिनेता अमिताभ बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन कुटुंबाबरोबर सुरू असलेल्या मतभेदांच्या अफवांना पुन्हा एकदा पूर्णविराम दिला आहे. बच्चन कुटुंबातील सुनेनं इंस्टाग्रामवर 'बिग बी'साठी वाढदिवसाची एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. यावर तिनं भावनिक नोटही जोडली आहे. या पोस्टमुळे बच्चन कुटुंबाबरोबर सुरू असलेल्या मतभेदाच्या चर्चा अफवा असल्याचं स्पष्ट होत आहे. 11 ऑक्टोबर रोजी ऐश्वर्या राय बच्चननं अमिताभ आणि तिची मुलगी आराध्याचा जुना फोटो पोस्ट केला होता. यामध्ये आराध्या आणि अमिताभ फोटोसाठी पोझ देताना दिले.

ऐश्वर्या राय दिल्या अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा : ऐश्वर्या रायनं शुभेच्छा दिलेल्या फोटोत आराध्याच्या हातात फुलं आहे. तिचे आजोबा अमिताभ बच्चननं आराध्याला लाडानं जवळ घेतल्याचे फोटोत दिसून येते. अमिताभ बच्चन आणि आराध्या हे ऑल व्हाईट लूकमध्ये दिसले. फ्लोरल ड्रेसमध्ये आराध्या खूपच आकर्षक दिसत आहे. या फोटोवर ऐश्वर्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हॅपी बर्थडे पा-आजोबा देव तुम्हाला सदैव आनंदी ठेवो.' या पोस्टवर ऐश्वर्यानं काही सुंदर इमोजी जोडले आहेत. यापूर्वी ऐश्वर्या रायनं घटस्फोटाच्या अफवांना ब्रेक लावला होता. नुकतीच ती मुलगी आराध्याबरोबर पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. ती अनेक ठिकाणी अभिषेकबद्दलच्या भावना व्यक्त करताना दिसते.

बच्चन कुटुंबातील तणाव : गेली काही महिने बच्चन कुटुंबात तणाव असल्याच्या अफवा पसल्या आहेत. ऐश्वर्या ही अनेक दिवस बच्चन कुटुंबाबरोबर सार्वजनिक ठिकाणी गेलेली नाही. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नादरम्यान, ऐश्वर्या आराध्याबरोबर आली होती. तर अभिषेक, अमिताभ, जया आणि श्वेता बच्चन एकत्र दिसले होते. यामुळे कौटुंबिक कलहाच्या अफवांना खतपाणी मिळले होते. यानंतर अभिषेकनं घटस्फोटाची इन्स्टाग्रमावरील पोस्ट लाईक केल्यानंतर अफवेनं अधिकच जोर धरला होता. दरम्यान ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी ती तामिळ चित्रपट 'पोन्नियिन सेलवन: 2'मध्ये दिसली होती. तिचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर सुपर हिट ठरला होता. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर साऊथ स्टार विक्रम हा दिसला होता.

हेही वाचा :

  1. आराध्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ऐश्वर्या रायनं आयफा येथील रिपोर्टर यांना केलं गप्प, जाणून घ्या प्रकरण - iifa 2024
  2. आयफा 2024साठी ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्याबरोबर अबू धाबीला पोहचली, व्हिडिओ व्हायरल - aaradhya BACHCHAN
  3. ऐश्वर्या रायनं घटस्फोटाच्या अफवांना पुन्हा ब्रेक लावला, पॅरिस फॅशन वीकमध्ये लग्नाची अंगठी आली चर्चेत - Paris Fashion Week 2024

Last Updated : Oct 12, 2024, 2:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.