ETV Bharat / state

भिवंडीत किरकोळ वादातून मित्रावर खुनी हल्ला, आरोपी फरार

जखमी रोशन आणि हल्लेखोर आशिष या दोघा मित्रांमध्ये काल रात्री किरकोळ वाद झाला होता. त्या रागाच्या वादातून आशिषने लाकडी दांड्याने रोशन याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला.

हल्ल्यात जखमी तरुण रोशन चव्हाण.
author img

By

Published : Jun 18, 2019, 9:12 PM IST

ठाणे - मित्रासोबत किरकोळ वाद झाल्याच्या वादातून मित्राच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करत मित्राला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडीतील वेहळे गावातील दादोबा चौकात घडली आहे. रोशन बाळकृष्ण चव्हाण (वय 17) असे मित्राच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अशिष रमण थळे (वय 18) हा त्याच्यावर हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. तो फरार झाला आहे. आणि नारपोली पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Injured youngster roshan chavhan.
हल्ल्यात जखमी तरुण रोशन चव्हाण.

जखमी रोशन आणि हल्लेखोर आशिष या दोघा मित्रांमध्ये काल रात्री किरकोळ वाद झाला होता. त्या रागाच्या वादातून आशिषने लाकडी दांड्याने रोशन याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. लाकडी दंडाची उपट वर्मी लागल्याने रोशन जागीच बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला आजूबाजूच्या नागरिकांनी प्रथम उपचारासाठी मानकोली नाका येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले.

मात्र, त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी ठाण्याच्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे आज पहाटे उशिरा त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे, पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

या हल्ल्याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात अशिष थळे याच्या विरोधात भांदवि कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर हल्लेखोर अशिष फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जी. बी. गणेशकर करीत आहेत.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:भिवंडीत किरकोळ वादातून मित्रावर खुनी हल्ला, आरोपी फरार

ठाणे :- मित्रासोबत किरकोळ वाद झाल्याने त्या वादातून मित्राच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करत मित्राला जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याची घटना घडली आहे ही घटना भिवंडीतील वेहळे गावातील दादोबा चौकात घडली आहे,
रोशन बाळकृष्ण चव्हाण वय 17 असे मित्राच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे तर त्याच्यावर हल्ला करणारा अशिष रमण थळे वय 18 हा फरार झाला असुन नारपोली पोलीस त्याचा शोध घेत आहे,
जखमी रोशनचे हल्लेखोर आशिष या दोघा मित्रांमध्ये काल रात्री च्या सुमाराला किरकोळ वाद झाला होता त्या रागाच्या वादातून आशिषने लाकडी दांड्याने रोशन याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला, लाकडी दंडाची उपट वर्मी लागल्याने रोशन जागीच बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळला, त्यानंतर त्याला आजूबाजूच्या नागरिकांनी प्रथम उपचारासाठी मानकोली नाका येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले होते मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी ठाण्याच्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यात येऊन त्याच्यावर उपचार सुरू केले, आज पहाटे उशिरा त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे त्याची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे
या हल्ल्याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात अशिष थळे याच्या विरोधात भादवि कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे घटनेनंतर हल्लेखोर अशिष फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे, या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जी बी गणेशकर करीत आहेत,

Conclusion:मित्रावर खुनी हल्ला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.