ठाणे: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर नवरा शशिकांत हा कल्याण पश्चिम भागातील वायलेनगर मधील वेदांत सोसायटीत राहतो. त्याच्या पहिल्या बायकोचे निधन झाल्याने तीन महिन्यापूर्वीच त्याने रंजितासोबत दुसरे लग्न केले. तसेच रंजिताच्याही पहिल्या नवऱ्याचे निधन झाले आहे. ती ही मुबंईतील विद्याविहार भागात असलेल्या 'इंडिया हेल्थ इन्शुरन्स' कंपनीत नोकरीला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून दोघा नवरा-बायकोमध्ये नोकरी करण्यावरून वाद होत होते. याच वादातून बायकोने नवऱ्याचे घर सोडले. ती शहाडमधील ओम कृष्ण पुरम सोसायटीत राहणाऱ्या आपल्या आईकडे राहून नोकरीच्या ठिकाणी जात होती.
बायकोवर चाकूहल्ला: रंजिता ही १२ मे रोजी शुक्रवारी सकाळच्या सुमारास नोकरीवर जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान नवऱ्याने तिला सोसायटीच्या गेटवर अडविले आणि तिच्यावर चाकूहल्ला केला. बायको जमिनीवर पडल्याने पाहून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला.
रुग्णालयात उपचार सुरू: दुसरीकडे रंजिता सोसायटीच्या गेटवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून तिच्या नातेवाईकाने सोसायटीतील रहिवाशांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रंजिताच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्लेखोर नवऱ्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या आधारे हल्लेखोर नवऱ्याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोदे करीत आहेत.
रेल्वे स्थानकावर पत्नीवर चाकूहल्ला: मुंबई शहरातील पश्चिम उपनगराच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर 12 ऑक्टोबर, 2022 रोजी रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली होती. चर्चगेट रेल्वे स्थानकावर एका ४५ वर्षीय महिलेवर तिच्या पतीने चाकूने वार करत तिला गंभीर जखमी केल्याची धक्कदायक घटना घडली होती.
घरगुती वादातून हल्ला: घरगुती वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली होती. घटनास्थळी उपस्थित जीआरपी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला जवळच्या जीटी रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या महिलेची प्रकृती चिंताजनक असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती रोशन नाईक याला अटक केली आहे. पत्नी हेमा नाईक रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती.
हेही वाचा: