ETV Bharat / state

डोंबिवलीत कौटुंबिक हिंसाचार; दोन्ही घटनेत पतीकडून पत्नीवर धारदार शस्त्राने वार

author img

By

Published : Feb 8, 2022, 8:14 PM IST

डोंबिवली पश्चिम व पूर्वेत राहणाऱ्या पती पत्नीमध्ये विविध कारणावरून भाडण होऊन एका पतीने घरात घुसून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आहे. तर दुसऱ्या घटनेत पतीने भर रस्त्यातच पत्नीवर धारदार चाकूने वार करून जीवघेणा हल्ला केला. या दोन्ही हल्ल्यात गंभीर जखमी पत्नींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पोलीस स्टेशन
पोलीस स्टेशन

ठाणे - डोंबिवली सांस्कृतिक शहर म्हणून ओळखली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून डोंबिवली शहर कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांनी हादरले आहे. डोंबिवली पश्चिम व पूर्वेत राहणाऱ्या पती पत्नीमध्ये विविध कारणावरून भाडण होऊन एका पतीने घरात घुसून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आहे. तर दुसऱ्या घटनेत पतीने भर रस्त्यातच पत्नीवर धारदार चाकूने वार करून जीवघेणा हल्ला केला. या दोन्ही हल्ल्यात गंभीर जखमी पत्नींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. विष्णू नगर पोलिसांनी एका पतीला बेड्या ठोकल्या आहेत. तर रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेतील पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

  • हल्लेखोर पतीला अटक

सोमवारी दुपारी दीड-दोनच्या सुमारास आरोपी पती शिवाजी हा सागर आणि त्याची आई राहत असलेल्या घरी आला. आपल्यासोबत राहत नसल्याने आधीच संताप मनात असलेल्या शिवाजी याने घरात घुसून धारदार शस्त्राने पत्नीच्या पोट व पाठीवर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून शिवाजी याने तेथून पळ काढला. तर दुसरीकडे या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या सागरच्या आईला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी सागरच्या जबानीवरून पोलिसांनी भादंवि कलम 307 अन्वये गुन्हा नोंदवून फरार हल्लेखोर पती शिवाजीला अटक केली.

  • भररस्त्यात पतीने केलेले पत्नीवर चाकूचे वार

दुसऱ्या घटनेत भररस्त्यात पतीने पत्नीवर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना डोंबिवली पूर्व येथील दत्त नगर परिसरात घडली. हल्लेखोर पतीविरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमनाथ देवकर (४५) असे हल्लेखोर पतीचे नाव आहे. त्याची पत्नी वंदना देवकर हिच्या तक्रारीवरुन रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी हल्लेखोर पतीचा शोध सुरु केला आहे.

  • पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असतानाच भर भरस्त्यात हल्ला

डोंबिवली पूर्वेत दत्तनगर येथील गावदेवी मंदिराजवळ आरोपी सोमनाथ व पत्नी वंदना राहतात. सोमनाथ हा बेरोजगार असून तो वारंवार पत्नीवर संशय व घरातील पैसेही चोरते, असा आरोप करत असल्याने पत्नी वंदनाने पतीला अनेक वेळेला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमनाथ ऐकत नसल्याने वैतागलेल्या पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास वंदना या पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घरासमोर रिक्षात बसल्या असतानाच, अचानक पाठीमागून आलेल्या सोमनाथने वंदना यांच्या मानेच्या खाली पायावर आणि हातावर चाकूने वार करून घटनास्थळावरुन पळ काढला.

  • हल्लेखोर पतीचा शोध

गंभीर जखमी झालेल्या या महिलेला रिक्षाचालकाने रुग्णालयात उपचारासाठी घेवून जात होता. गस्त घालत असलेल्या पोलिसांनी रिक्षात महिला पाहिल्यावर रिक्षा थांबवून रिक्षाचालकाकडे विचारणा केली. रिक्षाचालकाने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी जखमी महिलेला पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस हल्लेखोर पतीचा शोध घेत आहेत.

  • पत्नीने पतीसोबत राहण्यास नकार दिल्याच्या वादातून घडला प्रकार

पहिल्या घटनेत डोंबिवली पश्चिम डोंबिवलीच्या सरोवर नगरमधील तुकाराम दर्शन चाळीत राहणाऱ्या सागर भुजंग (21) या तरुणाच्या तक्रारीवरून विष्णूनगर ठाण्यात आईवर घरात घुसुन धारदार शस्त्राने वार केल्याचा गुन्हा पित्याविरोधात दाखल केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवाजी केशवराव भुजंग (43) याला अटक केली आहे. सागर आणि त्याची आई हे दोघेजण शिवाजीपासून गेल्या 3 ते 4 वर्षांपासून वेगळे राहतात. आरोपी पती शिवाजी हा कोणताही कामधंदा करत नाही. त्यावरून मुलगा सागर, आई व शिवाजी यांच्यात नेहमी वाद होऊन भांडण होत असत. त्यामुळेच सागराची आई आणि वडील हे वेगवेगळे राहत होते.

हेही वाचा - Prisoner Committed Suicide : हर्सूल कारागृहात कैद्याची आत्महत्या, रुमालाने घेतला गळफास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.