ETV Bharat / state

Heavy Rain In Thane : काळू नदीला आलेल्या पुरामुळे १२ गावांचा संपर्क तुटला; रुंदे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - floods on Kalu river

काळू नदीला पूर ( Flood of Kalu river ) आल्याने रुंदे गावातील ( Runde village ) नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे 12 गावांचा संपर्क कल्याण, टिटवाळा शहरांशी असलेला संपर्क ( Kalyan City ) तुटला आहे. रुंदे ग्रामपंचायत प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

12 villages cut off due to floods
पुरामुळे 12 गावांचा संपर्क तुटला
author img

By

Published : Jul 12, 2022, 9:09 PM IST

ठाणे - कल्याण तालुक्यातील काळू नदीला पूर ( Flood of Kalu river ) आल्याने रुंदे गावातील ( Runde village ) नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील १२ गावांचा कल्याण, टिटवाळा शहरांशी असलेला संपर्क तुटला आहे. दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने रुंदे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्य, राष्ट्रीय आपत्ती दलाची पथके कल्याण परिसरात तैनात आहेत. या पथकांनी रुंदे नदीला आलेला पूर, परिसरातील गावांची पाहणी केली.

हेही वाचा - Video : पाण्याचा अंदाज न आल्याने तलावात घुसली कार

पूर ओसरेपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागणार - उल्हास खोऱ्यातील पावसाचे पाणी रायता, काळू, उल्हास नदीतून खाडीला जाऊन मिळते. रुंदे नदी परिसरात उशीद, फळेगाव, मढ, गोरले, भोंगाळपाडा, हाल गावे आहेत. शहापूर, वासिंद, खडवली भागातील बहुतांशी वाहन चालक रस्ते मार्गाने रुंदे पुलावरून टिटवाळा, कल्याणकडे येतात. रुंदे नदी परिसरातील बहुतांशी ग्रामस्थांचा दूध व्यवसाय आहे. या भागातील नोकरदार कामानिमित्त मुंबई परिसरात नोकरीसाठी जातात. पूर ओसरेपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

प्रशासन सज्ज - या गावांमधील अनेक विद्यार्थी टिटवाळा, कल्याण, म्हारळ भागातील शाळांमध्ये शिक्षणासाठी येतात. त्यांची रुंदी नदीला पूर आल्याने अडचण झाली आहे. शाळेच्या बस या भागात कशा न्यायच्या असा प्रश्न शाळा चालकांना पडला आहे. काळू नदीवरील गुरवली पुल मुसळधार पाऊस सुरूच राहिला तर, पाण्याखाली जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. पुलावरून पाणी वाहत असेल तर कोणीही वाहन चालकाने पुलावरून जाण्याचे धाडस करू नये, असे आवाहन पूल परिसरात प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे आवाहन कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात केले जात आहे.

हेही वाचा - Flood in Shahapur : ठाण्यात पुराचे थैमान; पुरामध्ये चौघे जण बेपत्ता, २ मृतदेह सापडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.