नवी मुंबई - पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरात जोरदार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. खरीप हंगामातील पिके काढण्याची कामे सुरू असताना पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ चित्र उडाल्याचे पाहायला मिळाले. ऐन भात काढणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई, पनवेल अन उरण परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आज (दि. 10 ऑक्टोबर) दुपारी नवी मुंबईसह पनवेल उरणमध्ये मेघगर्जनेसह पावासाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पनवेल, नवी मुंबई, उरण विभागात अनेक ठिकाणी भात कापणीसाठी तयार झाले आहे. यावेळी जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे भातशेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
हेही वाचा - नवी मुंबईत गँगस्टर राजेश कैकाडी पोलिसांच्या जाळ्यात