ETV Bharat / state

भिवंडीत गुजरातच्या एसटी बसचालकाला मारहाण; एसटीची काच फोडून केले नुकसान - एसटी

रिक्षातील प्रवाशी बिलाल अहमद अन्सारी (२३ रा. चव्हाण कॉलनी ) याने एसटीमध्ये चढून चालक प्रवीण याला शिवीगाळ करीत बुक्क्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने धिंगाणा घालत रस्त्यावरील दगड उचलून बसच्या पाठीमागील काचेवर फेकून काच फोडून एसटी बसचे नुकसान केले

भिवंडीत गुजरातच्या एसटी बसचालकाला मारहाण; एसटीची काच फोडून केले नुकसान
author img

By

Published : May 18, 2019, 5:18 PM IST

ठाणे - भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीचा फटका गुजरात राज्यातील एसटी चालकाला बसला असून एका रिक्षातील प्रवाशाने बसचालकाला मारहाण करून बसची काच फोडली. ही घटना भिवंडीतील अशोकनगर प्रवेशद्वारासमोर घडली आहे. प्रवीण सुरसिंग पारगी (३३ रा.नवागाम, गुजरात ) असे मारहाण झालेल्या एसटी बस चालकाचे नाव आहे.

भिवंडीत गुजरातच्या एसटी बसचालकाला मारहाण; एसटीची काच फोडून केले नुकसान

प्रवीण हा बसचालक भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने शुक्रवारी सायंकाळच्या सुमाराला जात असताना एसटी बस ( केजीजे - १८ झेड - २७६९ ) अशोकनगर येथे आली. त्याच दरम्यान बसच्या पाठीमागून एक भरधाव रिक्षा बसला धडकली. त्यावेळी रिक्षातील प्रवाशी बिलाल अहमद अन्सारी (२३ रा. चव्हाण कॉलनी ) याने एसटीमध्ये चढून चालक प्रवीण याला शिवीगाळ करीत बुक्क्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने धिंगाणा घालत रस्त्यावरील दगड उचलून बसच्या पाठीमागील काचेवर फेकून काच फोडून एसटी बसचे नुकसान केले व प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण केला.

त्यामुळे भयभीत झालेल्या एसटी बसचालक प्रविण पारगी यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन बिलाल अन्सारी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार बिलालवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक योगेश दाभाडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन स्थळाचा पंचनामा करून मारहाण व एसटीचे नुकसान करणाऱ्या बिलालला तत्काळ अटक केली आहे. त्यानंतर त्याला शनिवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

भिवंडीत गुजरातच्या एसटी बस चालकाला मारहाण; एसटीची काच फोडून केले नुकसान 

ठाणे :- भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीचा फटका गुजरात राज्यातील एसटी चालकाला बसला असून एका रिक्षातील प्रवाशाने बस चालकाला मारहाण करून बसची काच फोडल्याची घटना घडली आहे. हि घटना भिवंडीतील अशोकनगर प्रवेशद्वारासमोर घडली आहे. प्रवीण सुरसिंग पारगी (३३ रा.नवागाम ,गुजरात ) असे मारहाण झालेल्या एसटी बस चालकाचे नांव आहे.

प्रवीण  हा बसचालक भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने काल सायंकाळच्या सुमाराला जात असताना एसटी बस ( क्र.जीजे - १८ - झेड - २७६९ ) अशोकनगर येथे आली. त्याच दरम्यान बसच्या पाठीमागून एक भरधाव रिक्षा बसला धडकली. त्यावेळी रिक्षातील प्रवाशी बिलाल अहमद अंसारी (२३ रा. चव्हाण कॉलनी ) याने एसटीमध्ये चढून चालक प्रवीण यास शिवीगाळ करीत ठोश्याबुक्क्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने धिंगाणा घालीत रस्त्यावरील दगड उचलून बसच्या पाठीमागील काचेवर फेकून काच फोडून एसटी बसचे नुकसान केले व प्रवाश्यांच्या  सुरक्षेला धोका निर्माण केला. त्यामुळे भयभीत झालेल्या एसटी बसचालक प्रविण पारगी यांनी भिवंडी  शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन बिलाल अंसारी याच्याविरोधात भादंवि.कलम ३५३ ,३३६,३२३,५०४ सह सार्वजनिक मालमत्ता कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक योगेश दाभाडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन स्थळ पंचनामा करून मारहाण व एसटीचे नुकसान करणारा बिलाल अंसारी यास तात्काळ ताब्यात घेऊन अटक करून शनिवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.