ETV Bharat / state

गुडविन घोटाळा पूर्वनियोजित होता; ठाणे पोलिसांना तपासात मिळाली माहिती

author img

By

Published : Nov 6, 2019, 8:05 PM IST

पोलिसांना या छापा सत्रात सोन्याचे खोटे दागिने मिळाले आहेत. त्यामुळे हे दागिने जाणून बुजून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून या कटात कोण कोण सहभागी आहे याचा देखील शोध घेतल्या जात आहे. यासाठी सीसीटीव्हीची तपासणी होणार आहे.

गुडविन ज्वेलर्स

ठाणे - गुडविन ज्वेलर्सने वाढीव व्याजाचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर गुडविन ज्वेलर्स विरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. गुडविन ज्वेलर्सचे संचालक सुनील कुमार आणि सुधीश कुमार यांनी पूर्वतयारी करूनच सर्व दुकानांना टाळे लावले आहे. मात्र, या सर्व पैशाचे काय केले, याचा तपास होणे बाकी आहे. पोलिसांनी या संदर्भात अनेक बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्याचा तपास केल्यावरच ग्राहकांच्या पैशाचा हिशोब लागणार आहे.

गुडविन ज्वेलर्स दुकानाचे दृश्य

गुडविन ज्वेलर्सची ठाण्यासह डोंबिवली आणि अंबरनाथ या परिसरात चार दुकाने आहेत. त्यापैकी सील केलेल्या तीन दुकानांचे कुलूप तोडून त्या दुकानांची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. साधारणत: एका दुकानात सहा-सात तास केलेल्या तपासणीत तीन दुकानांमधून गोल्ड कोटेड दागिने मिळून आले आहेत. त्यांची अंदाजे किंमत दीड लाखांच्या आसपास आहे. यावरून हा घोटाळा आधीच शिजला असल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांना या छापा सत्रात सोन्याचे खोटे दागिने मिळाले आहेत. त्यामुळे हे दागिने जाणून बुजून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून या कटात कोण-कोण सहभागी आहे, याचा देखील शोध घेतला जात आहे. यासाठी सीसीटीव्हीची तपासणी होणार आहे आणि आवश्यकता वाटल्यास त्याचा पुरावा म्हणून वापर होणार आहे. सुरुवातीला काही ग्राहकांना जास्त व्याजाचा परतावा करून गुडविन ज्वेलर्सचे संचालक सुनील कुमार आणि सुधीश कुमार यांनी नंतर नागरिकांची करोडो रुपयांनी फसवणूक केली आहे.

पैशाचे केले काय, हाच तपासाचा मुख्य भाग

या घोटाळ्याच्या मागे कोणते कारण होते, याचा आता शोध घेतला जात असून एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवी घेऊन त्या पैशाचे काय केले, याचा शोध ठाणे आर्थिक गुन्हे शाखा घेणार आहे. बँकेच्या व्यवहारावरून पुढील तपास होणार असून त्यासाठी आवश्यक माहितीचे पत्र ठाणे पोलिसांकडून बँकांना पाठवले जाणार आहे.

हेही वाचा- वर्चस्वाच्या वादातून तृतीयपंथीयांच्या दोन गटात राडा

Intro:गुडविन घोटाळा हा प्रीप्लानच ठाणे पोलिसांना तपासात मिळाली माहितीBody:

वाढीव व्याजाच्या आमिषातून करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या गुडविन ज्वेलर्स च्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केलेल्या तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली असुन गुडविन ज्वेलर्सचे संचालक सुनीलकुमार आणि सुधीशकुमार यांनी पुर्वतयारी करूनच सर्व दुकानांना टाळे लावले आहे मात्र या सर्व पैशाचे काय केले याचा तपास होणे बाकी आहे पोलिसांनी या संदर्भात अनेक बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली असुन त्याचा तपास केल्यावरच ग्राहकांच्या पैशाचा हिशोब लागणार आहे.
गुडविन ज्वेलर्सची ठाण्यासह डोंबिवली आणि अंबरनाथ या परिसरात चार दुकाने आहेत. त्यापैकी सील केलेल्या तीन दुकानांचे कुलूप तोडून त्या दुकानांची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.साधारणता: एका दुकानात सहा-सात तास केलेल्या तपासणीत त्या तीन दुकानांमधून गोल्ड कोटेड असे दागिने मिळून आले आहेत.त्यांची अंदाजे किंमत दीड लाखांच्या आसपास आहे यावरून हा घोटाळा आधीच शिजला असल्याची माहिती पुढे आली आहे.सुरवातीला काही ग्राहकांना जास्त व्याजाचा परतावा करून गुडविन ज्वेलर्सचे संचालक सुनीलकुमार आणि सुधीशकुमार यांनी नागरिकांकडून हा करोडो रुपयांचा घोटाळा झाला आहे. पोलिसांना या धाड सत्रात सोन्याचे खोटे दागिने मिळाले आहेत त्यामुळे हे दागिने जाणून बुजून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे यावरून आता पोलीस या कटात कोण कोण सहभागी आहे याचा देखील शोध घेत आहेत यासाठी सीसीटीव्ही ची तपासणी होणार आहे आणि आवश्यकता वाटल्यास त्याचा पुरावा म्हणून वापर होणार आहे.
पैशाचे केले काय हाच तपासाचा मुख्य भाग
या घोटाळ्याचा मागे कोणते कारण होते याचा शोध आता सुरू असुन एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवी घेऊन त्या पैशाचे काय केले याचा शोध आता ठाणे आर्थिक गुन्हे शाखा घेणार आहे बँकेच्या व्यवहारावरून पुढील तपास होणार असून त्यासाठी आवश्यक माहितीचे पत्र ठाणे पोलिसांकडून बँकांना पाठवले जाणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.