ETV Bharat / state

Generic Aadhaar Thane : ठाण्यातील युवकाचे लोक सेवेसाठी जेनरिक आधार मेडिकल ; उद्योगपती रतन टाटा यांनी केले अर्जुनाचे कौतुक - जेनरिक आधारचे तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे

ठाण्यातील 20 वर्षाच्या एका युवकाने सर्व सामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठी तीन वर्षापूर्वी सुरू केलेला व्यवसाय आता संपूर्ण भारतभर पोहोचला आहे. अर्जुन देशपांडे या ठाणेकराची दखल आता देशातील अनेक राज्यसरकार देखील घेत आहेत. रतन टाटा यांना देखील या व्यवसायाची आवड निर्माण झाली आहे. त्यांनी देखील या व्यवसायात गुंतवणूक केलेली आहे.

Generic Aadhaar Thane
लोक सेवेसाठी जेनरिक आधार मेडिकल
author img

By

Published : Jan 18, 2023, 12:05 PM IST

Updated : Jan 18, 2023, 12:47 PM IST

ठाण्यातील युवकाचे लोक सेवेसाठी जेनरिक आधार मेडिकल

ठाणे : मेडिकल स्टोअरमध्ये उधारी औषध मागणाऱ्या आजोबांना पाहून अर्जुन देशपांडे हा युवक प्रेरित झाला. औषध क्षेत्रात असलेल्या अनेक भारताबाहेरील कंपन्या भारतात हजारो कोटींचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे भारतातील पैसा भारताच्या बाहेर जात आहे. म्हणून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठी अर्जुन देशपांडे यांनी जेनेरिक आधार या नावाने स्वस्त औषध विक्रीचा व्यवसाय सुरू केला. अवघ्या 3 वर्षात हा व्यवसाय 500 कोटींपर्यंत पोहोचला. त्यामुळे ही औषधे घेणाऱ्या लाखो रुग्णांना स्वस्त औषध मिळाल्याने कमीत कमी 2000 कोटींचा फायदा झाला आहे. कॅन्सर, हृदयरोग मेंदूचे आजार, मधुमेह, ब्लड प्रेशर या आजाराचे रुग्ण जर या औषधांचा वापर करतील तर त्यांच्या औषाधांवरील खर्चात 80 टक्के बचत होवू शकते असे अर्जुन यांनी सांगितले.




गरजूना स्वस्तात औषधे दिली : ही कंपनी अर्जुनने वयाच्या १६व्या वर्षी स्थापन केली. कंपनी उत्पादकांकडून थेट औषधांची खरेदी करते आणि ग्राहकांना विकते. खासकरून करोनाच्या काळात अर्जुनने अनेक गरजूना स्वस्तात औषधे पुरवली आहेत. रतन टाटांसारख्या मोठ्या व्यक्तीने जेनेरिक आधारचे आर्थिक तसेच नैतिक समर्थन केले. देशात सध्या करोना व्हायरस विरुद्धची लढाई सुरू आहे. जेनेरिक कंपनीच्या माध्यमातून अर्जुनने एक मिशन हाती घेतले आहे.

८५ ते ९०% औषधे ही भारतातच बनतात : ४ महिन्यात ठाण्यातून सुरू झालेली कंपनी स्वस्त दरात औषधे १०० हून जास्त शहरात देशभरात उपलब्ध करून दिली आहेत. ४ महिन्याच्या लॉकडाऊन काळात लोकांना रोजगार संधी मिळाली. ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनवर जगणाऱ्या लोकांना औषधे कमीत कमी किंमतीत मिळावी. तसेच भारतातील ६०% लोकांना औषधे परवडत नसल्यामुळे विकत घेता येत नाहीत. पण ८५ ते ९०% औषधे ही भारतातच बनतात, ही जेनेरिक औषधे आहेत. त्यामुळे जेनेरिक औषधे कमी दरात उपलब्ध करण्याचा अर्जुन देशपांडेंचा प्रयत्न आहे.



अनेक पुरस्कारांनी सन्मानित : अनेक पुरस्काराने अर्जुनला सन्मानित करण्यात आले आहे. भारतातल्या टॉप १० कंपनी मालकांनीही अर्जुनसोबत व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दिल्लीहून थेट ठाण्यात येऊन त्यांनी अर्जुनची भेट घेतली आहे. यामध्ये खासकरून उद्योगपती रतन टाटा यांनी अर्जुनाचे कौतुक करून, त्याच्या कंपनीचे शेअर्स घेतले आहेत.



कोविडमध्येही कमी किंमतीत औषध दिली : कोरोना काळामध्ये सर्वसामान्य नागरिक जेव्हा रेमडीसीवरसाठी शोधाशोध करत होते. त्या काळामध्ये अर्जुन देशपांडे यांनी फक्त हजार रुपयांमध्ये औषध उपलब्ध करून दिले होते. यामुळे अनेकांचे जीवदेखील वाचले होते. अशाच प्रकारे नवनवीन योजना राबवत अर्जुनकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी मदत करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो.



अनेक राज्य उत्सुक : या नागरिकांना दिलासा देणाऱ्या जेनेरिक आधार या संकल्पनेला अनेक राज्यांनी पाठिंबा तर दिला आहे. सोबत आपापल्या राज्यात आरोग्य विभागांमार्फत नागरिकांना सुविधा देण्याचे आवाहन देखील अर्जुन यांनी केले आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश ही राज्ये यासाठी आग्रही देखील आहेत.


हेही वाचा : Thane Crime News ब्लड प्रेशरच्या बनावट गोळ्यांचा लाखोंचा साठा जप्त सवलतीच्या चक्रव्यूहात रुग्णांचा जीव धोक्यात

Last Updated : Jan 18, 2023, 12:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.