ETV Bharat / state

डिजिटल पद्धतीने भरणार मीरा भाईंदर महापालिकेची विशेष महासभा - मीरा भाईंदर पालिकेची विशेष महासभा उद्या बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल पाच महिन्यानंतर उद्या सकाळी ११.३० च्या सुमारास मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात पार पडणार आहे. यामध्ये सर्व नगरसेवक अधिकारी वर्ग झूम अ‌ॅपच्या माध्यमातून सामील होणार आहेत. या महासभेची लिंक लोकप्रतिनिधीना पूर्वीच पाठवण्यात येणार असून ११ वाजताच हजर राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

मीरा भाईंदर पालिकेची विशेष महासभा
मीरा भाईंदर पालिकेची विशेष महासभा
author img

By

Published : Aug 12, 2020, 6:54 PM IST

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यापासून रखडलेली मीरा भाईंदर महापालिकेची महासभा येत्या १३ ऑगस्ट रोजी दूरचित्रसंवादाद्वारे भरवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. डिजिटल पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या महासभेचा काही नगरसेवकांनी विरोध केला असून काहींनी समर्थन दर्शवले आहे.

मीरा भाईंदर शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. सामाजिक अंतर तसेच सध्या उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता मीरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने डिजिटल पध्दतीने महासभा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल पाच महिन्यानंतर उद्या १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात पार पडणार आहे. यामध्ये सर्व नगरसेवक अधिकारी वर्ग झूम या अ‌ॅपच्या माध्यमातून सामील होणार आहेत. या महासभेची लिंक लोकप्रतिनिधीना पूर्वीच पाठवण्यात येणार असून ११ वाजताच हजर राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच विषय मांडण्याकरिता काही तांत्रिक गोष्टी कश्या प्रकारे मांडाव्या तसे सांगण्यात आले आहे.

येत्या विशेष महासभेत तीन विषयापत्रावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने परिवहन सेवेच्या सुधारित आणि मूळ अंदाज पत्र मंजुरीबाबत आणि अग्निशमन विभागाच्या सुधारित मूळ अंदाजपत्र मंजुरीबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.