ठाणे - शहराच्या राबोडी परिसरातील करिश्मा सोसायटीतील पहिल्या मजल्यावरील घरात स्फोट झाला. गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने हा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून वर्तवण्यात आला आहे. डेव्हिड सरोसे यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून तो बंद होता. या स्फोटात जीवित हानी झालेली नाही. मात्र, घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी अग्निशामक दलाचे 1 रेस्क्यू वाहन व 1 जीप, राबोडीचे पोलीस निरिक्षक व कर्मचारी, बॉम्ब शोध व निष्कासन पथक तातडीने दाखल झाले आहेत. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून स्फोटाचे नेमके कारण अद्यप समजलेले नाही. बॉम्ब शोध व निष्कसन पथकाकडून पुढील तपास सुरू आहे. यामागे कोणताही घातपात नसल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा - तामिळनाडूमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटात तिघांचा मृत्यू, 4 जखमी