ETV Bharat / state

Sanjay Bhoir News: जीएसटी घोटाळ्यात माजी नगरसेवक संजय भोईर यांना अटक; ९ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश - कोण आहेत संजय भोईर

तब्बल सव्वा दोन कोटींचा सर्व्हिस टॅक्स जमा केला, मात्र सरकारी तिजोरीत भरणा न केल्याने ठाणे पालिकेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांना अटक केली. दरम्यान भिवंडी आयुक्तालयाने गुरुवारी अटक करून न्यायालयासमोर उभे असता या प्रकरणी न्यायालयाने संजय भोईर यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्यांना ९ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.

Sanjay Bhoir News
संजय भोईर
author img

By

Published : Feb 24, 2023, 8:53 AM IST

ठाणे : मूळचा रेती व्यवसायिक असलेल्या आणि मालकीची विक्की इंटरप्राइझेसचेचे सर्वेसर्वा संजय भोईर यांनी या व्यापार, व्यवसायातून सर्व्हिस टॅक्सच्या रूपाने २ कोटी २६ लाख रुपयांची रक्कम विविध व्यापाऱ्यांकडून घेतली. मात्र त्याचा भरणा जीएसटी विभागात करण्यात आलेला नाही. सदर प्रकरणात विक्की इंटरप्राइझेसचे २००८ या वर्षात सर्व्हिस टॅक्स नोंदणी केली. त्यानंतर केवळ २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षाचे रिटर्न भरले. मात्र त्यानंतर सलग आठ वर्षाचा भरणाच केला नाही. शासकीय दस्तावेजानुसार आयटी रिटर्न भरले. मात्र सर्व्हिस टॅक्स जमा केला पण भरला नाही. त्यामुळें जीएसटीचे २ कोटी २६ लाख रुपयांचा महसूल बुडविल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात गुरुवारी संजय भोईर यांना अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले.

जीएसटी प्रशासन मागील काही दिवसांपासून आक्रमक : केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या जीएसटी कर संकलन विभाग मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. त्यांनी आतापर्यंतच्या अनेक कोटींच्या कर चुकवेपणावरती आळा घालण्यासाठी कारवाई सुरू केलेली आहे. यामध्ये अनेक राजकीय नेते, मोठमोठे व्यावसायिक यांना देखील कारवाईपासून वाचता आलेले नाही. न्यायालयाने संजय भोईर यांना ९ मार्च २०२३ पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

काही दिवसांपूर्वीच सतर्क झाले प्रशासन : हे प्रशासन मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे का? असा प्रश्न विचारला जात होता. अशा वेळी विविध प्नश्नानंतर हे प्रशासन कार्यरत झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकांना दंड आणि कर चुकवता आलेला नाही, हे देखील समोर आलेले आहे. या कारवाईत कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा त्यांच्या नेत्याला अभय मिळालेले दिसले नाही. प्रशासनाकडून योग्य ती कारवाई सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोण आहेत संजय भोईर : संजय देवराम भोईर, ठाणे महानगरपालिकेतील अत्यंत उत्साही आणि सक्रिय नगरसेवक म्हणून आळखले जातात. त्यांनी 1997 मध्ये सक्रिय राजकीय कारकीर्द सुरू केली. ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ सुरू केला. टीएमसी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी ६० दिवस काम केलेले आहे. त्यांच्यावर 2017 साली अपहरण, खंडणी, मारहाण अशाप्रकारचे चार गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल होते.

हेही वाचा : Mumbai Crime News: मित्राच्या मुलीवर बलात्कार करून केले गर्भवती, आरोपीला न्यायालयाने सुनावला 10 वर्षांचा तुरुंगवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.