ठाणे - घोडबंदर रोडवरील एका मॉलमध्ये भीषण आग लागली आहे. ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी ही आग लागली. यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. रात्री 8.30 च्या सुमारास लागलेली ही आग जवळपासच्या व्यावसायिक इमारतींमध्येही पसरली आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कापूरबावडी येथे सर्व्हिस रोडवर असलेल्या सिनेवंडर मॉल तसेच ओरियन पार्क या दोन्ही मॉलमध्ये अचानक मंगळवारी रोजी रात्री अचानक आग लागली. या आगीत आतापर्यंत कुठलीच जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्पातळीवर सुरू होते.
जीवितहानी नाही : मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सिनेवंडर मॉलच्या लागत असलेल्या ओरियन बिझनेसपार्क या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर आग लागल्याने बाजूलाच असलेल्या सिनेवंडर मध्येही आग पसरली. त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली. घटनास्थळी स्थानिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान, फायर वाहन, रेस्क्यू वाहन, वॉटर टँकर, जम्बो वॉटर टँकर वाहनासह उपस्थित आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू होते. दरम्यान या आगीमुळे कोणालाही जीवितहानी झाली नाही आणि कोणालाही दुखापत झाली नसल्याचे ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगीतले.
आगीमुळे वाहतूक कोंडी : दरम्यान या आगीमुळे घोडबंदर रोड कडे जाणाऱ्या दिशेने आणि घोडबंदर रोड वरून येणाऱ्या दिशेने दोन्ही मार्गीकांवर मोठ्या प्रमाणात बघायची गर्दी जमल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आवश्यक असलेली सर्व वाहना ही रस्त्यावर उभी राहिल्यामुळे या वाहतूक कोंडी मध्ये आणखीनच भर पडली या दोन्ही मॉलमध्ये जवळपास 70 ते 80 कार्यालया दुकानं होती त्यामुळे या ठिकाणी मोठी मनुष्यहानी होण्याची चिन्ह सुरुवातीला वर्तवली जात होती मात्र अग्निशामन दलाकडून आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे.