नवी मुंबई - ऐरोली, सेक्टर ५ येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमला काल (मंगळवार) रात्री ११.३० च्या सुमारास अचानक आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की, यामध्ये एटीएम मशीन, पासबुक एन्ट्री मशीन, कॅश डिपॉझिट मशीनचा पूर्णतः कोळसा झाला. तर वरील बोर्ड व आतील इंटेरिअर पूर्ण पणे जाळून खाक झाले आहे. एटीएमच्या बाजूलाच पेट्रोल पंप असल्याने ही आग आटोक्यात आणणे अत्यंत आवश्यक होते. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आली.
हेही वाचा - केंद्रीय सुरक्षा दलाच्या 22 कंपन्यांना नंदीग्राममध्ये उद्या तैनात राहणार
अवघ्या 10 मिनिटात आग आटोक्यात:
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ६ जवान तसेच १ एक्स टाईप फायर इंजिन व १ वॉटर ब्राउजर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या १० मिनिटांत ही आग आटोक्यात आणून होणारी मोठी दुर्घटना टाळली. परंतु आग लागण्याचे कारण अद्याप समजले नसून अधिक तपास सुरू असल्याचे अग्निशमन दलाचे ऐरोली केंद्र अधिकारी सुसविरकर यांनी सांगितले.
एटीएमला आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे:
एटीएम मशीनमधील पैशाचा जळून कोळसा झाला. बंधनकारक असतानाही सुरक्षा रक्षकांची नेमणूक न करणे, सोसायटीला सीसीटीव्ही कॅमेरा बंधनकारक असतानाही दुर्लक्ष करणे, तसेच फायर इनोसी, फायर ऑडिट याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा - 'बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार राज ठाकरे', भूमिपूजनावरुन नाराजी नाट्य