ठाणे - भिवंडी शहरात यंत्रमाग कारखाने, गोदाम तसेच मोती कारखाने मोठ्या प्रमाणात असून, या कारखान्यांना आग लागण्याच्या घटना नेहमी घडत असतात. आज शहरातील आसबीबी परिसरात असलेल्या एका मोती कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
कल्याण-भिवंडी मार्गावर आसबीबी कंपाऊंड परिसरात असलेल्या एका मोती कारखान्याला आज सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. दरम्यान आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आगीत कारखाना जळून खाक झाला आहे. दरम्यान अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहाणी झाली नाही.
हेही वाचा - लग्नपत्रिका वाटताना २६ वर्षीय नवरदेवाचा अपघात, जागीच मृत्यू, लग्नाळू स्वप्नांचा चुराडा