ठाणे - सध्या जिकडे तिकडे जो-तो फोनवर बोलताना आढळतो. कानात इयरफोन टाकले कि, त्याचे विश्वच त्या फोनमध्ये सामावून जाते. सर्वसामान्यासारखे न बोलता थोडे जोरात, थोड्या मोठ्या आवाजात आम्हचा मुलगा बोलतो, किंव्हा त्याला दहा हाका मारल्यावर मग प्रतिसाद देतो असे प्रकार आज प्रत्येक घरात घडत आहे. हा एक आजार असून तो प्रमाणापेक्षा जास्त इयरफोनचा वापर केल्यामुळे जडतो. हे एकूण आश्यर्य वाटतं ना! परंतु हे घडते आहे.
कोणत्याही वस्तूचा गरजेपेक्षा जास्त उपयोग केला कि तोटाचं होतो. मोबाईल जास्त वापल्यामुळेही अनेक आजार जडतात, काही ठिकाणी तर याचे व्यसनकेंद्रही उघडलेले आहेत. परंतु आता त्याच्या मागोमाग इयरफोनचा जास्त वापर केल्यामुळे अनेक आजार जडल्याचीही प्रकरणे समोर येत आहेत.यातील काही आजारांबद्दल तर लोकांना कळतही नाही.
एखाद्या कुटुंबीयात त्यांचा मुलगा अचानक जोरात बोलतो, किंवा नेहमी जास्त आवाजात बोलतो. म्हणजे त्याला भास होतो कि समोरच्याला कमी ऐकायला येत आहे, हा इयरफोनचा खरा दुष्परिणाम आहे. प्रमाणापेक्षा जास्त इयरफोन वापरल्यामुळे त्याला सतत वाटत असते कि आपल्या कानात इयरफोनच आहेत. तर यामुळे पुढे कानात शिट्टी वाजू लागते असे दोन महत्वाचे आजार सध्या वाढताना दिसत आहेत.
जसं प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते तशीच मर्यादा आपल्या कानांवर पडणाऱ्या आवाजाचीही आहे. ६० डेसीबलपेक्षा जास्त मोठा आवाज ऐकल्यावर आपल्या कानांना त्रास होतो. परंतु इयरफोन लावल्यानंतर हा आवाज १०० ते ११० डेसीबल पर्यंत जातो. त्यामुळे कानाचे अनेक आजार सध्या उद्भवत आहेत. कमी ऐकू येणे, कानात नेहमी शिट्टी वाजणे किंवा व्यक्ति मोठ्या आवाजात बोलू लागतो. तर, एकमेकांचे इयरफोन वापरल्यामुळे कानाचे इन्फेक्शन झाल्याचे असे अनेक आजार जडले जात आहेत. यामुळे सतत चिडचिड होणे, डोके दुखणे असे सतत सुरु राहते. आणि तरुण पिढीसाठी हे फार भयानक आहे.
यापासून बचावासाठी चांगल्या गुणवत्तेचे इयरफोन वापरणे, तसेच गरज असेल तेव्हाच इयरफोनचा वापर करणे. इयरफोनचा वापर करताना ते कमी आवाजात वापरणे. तसेच कानाला त्रास सुरू होताच वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेणे ही गरजेचे आहे.