ETV Bharat / state

सोसायट्यांची सुरक्षा वाढली; डोंबिवलीत सोसायट्याना एक हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वाटप - thousands of CCTV cameras

- एक कॅमेरा देशासाठी, समाजाच्या सुरक्षिततेसाठी ही संकल्पना राबवत कल्याण डोंबिवली शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन पोलीस उपायुक्तांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण डोंबिवली शहरातील दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीनंतर मागील तीन महिन्यात तीन हजाराहून अधिक ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाणे व भाजप नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या वतीने शहरातील सोसायट्यांना एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे मोफत देण्यात आले. डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त जे.डी. मोरे यांच्या हस्ते नागरिकांनी सुरक्षेसाठी 'तिसऱ्या डोळ्या'ची मदत स्वीकारली.

एक हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे  वाटप
एक हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वाटप
author img

By

Published : Jun 4, 2022, 3:34 PM IST

ठाणे - एक कॅमेरा देशासाठी, समाजाच्या सुरक्षिततेसाठी ही संकल्पना राबवत कल्याण डोंबिवली शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन पोलीस उपायुक्तांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण डोंबिवली शहरातील दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीनंतर मागील तीन महिन्यात तीन हजाराहून अधिक ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

एक हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वाटप

त्याचाच एक भाग म्हणून डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाणे व भाजप नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या वतीने शहरातील सोसायट्यांना एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे मोफत देण्यात आले. डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त जे.डी. मोरे यांच्या हस्ते नागरिकांनी सुरक्षेसाठी 'तिसऱ्या डोळ्या'ची मदत स्वीकारली.

गुन्ह्याची उकल सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने शक्य - डोंबिवली व कल्याण शहरातील गुन्हेगारी वाढत असतानाच या गुन्ह्यांची उकल कमीत कमी कालावधीत करणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने करणे तसेच खऱ्या गुन्हेगाराला अटक करणे पोलिसांना शक्य होत आहे. साहजिकच शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटिव्ही कॅमेरा महत्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी दुकानाबाहेर, सोसायट्यामध्ये तसेच गल्लीबोळात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांच्या तपासाला अडथळे येतात. गुन्हेगारांवर वचक बसवून त्यांच्यात भीती निर्माण करत त्यांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी एक कॅमेरा देशासाठी समाजाच्या सुरक्षिततेसाठी या संकल्पनेअंतर्गत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन केले.

तीन महिन्यात तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे - आतापर्यंत पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तीन महिन्यात शहरात तीन हजार कॅमेरे ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. शिवाय भाजप नगरसेवक विकास म्हात्रे, कविता म्हात्रे व विष्णू नगर पोलीस ठाणे डोंबिवलीच्या वतीनेही डोंबिवली शहरातील विविध सोसायट्यांना एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे वाटण्यात आले. यावेळी डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त जे.डी. मोरे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने कॅमेरा महत्वाची भूमिका बजावत असल्याने या कॅमेऱ्याचे महत्व वाढल्याचे नमूद केले.

हेही वाचा - Jewelers Owners Attack Dombiwali : तोंडावर मास्क घालून ज्वेलर्स मालकावर चाकूने हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.