ETV Bharat / state

ठाणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू - जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर - आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे

ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या मुंबईत कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे.

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
author img

By

Published : Mar 12, 2020, 7:35 AM IST

Updated : Mar 12, 2020, 8:11 AM IST

ठाणे - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, तसेच तत्काळ उपाययोजना करता याव्यात यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यामध्ये आजपासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्याची घोषणा केली आहे.

ठाणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

ठाणे जिल्हा मुंबई शहरालगत असल्यामुळे अनेक पर्यटक ठाणेमार्गे प्रवास करतात. तसेच मुंबईत कामाला असलेले अनेजण ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि विषाणूंचा फैलाव होऊ नये, म्हणून तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यात हा कायदा लागू केल्याचे जाहीर केले आहे.

या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस, आरोग्य, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महसूल, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण, औद्योगिक विभाग तसेच सेवाभावी संस्था यांच्यावर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्व विभागांनी जबाबदारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून दैनंदिन अहवाल सादर करायाचा आहे.

आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून ती पूर्णवेळ तैनात ठेवायची आहेत. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करायची आहे. तसेच स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणे, जिल्ह्यातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे आदी कामे केली जाणार असून हा कायदा लागू केल्यामुळे आता आवश्‍यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्‍टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. खासगी रुग्णालयांनी सहकार्य करीत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार संबधित विभागाला दिले आहेत. मास्कची जादा दराने विक्री, औषधांची साठेबाजी केल्यास तत्काळ कारवाई करण्याचे अधिकार संबधित विभागाला दिले आहेत.

सेवाभावी संस्थांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. पोलीस यंत्रणेने समाज माध्यमातून अफवा अथवा गैरसमज पसरविणारे शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. सार्वजनिक कार्यक्रम आयोजकांचे प्रबोधन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिले आहेत.

जनतेमध्ये भीतीयुक्त वातावरण तयार होऊ नये म्हणून व्यापक प्रचार, प्रसिध्दी, जनजागृती केली जात आहे. शाळा अंगणवाडी मध्ये हात धुण्याची प्रात्यक्षिके करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही जागृती केली जात आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आजारासंबंधी प्रबोधनपर फलक, होर्डींग लावण्यात आले आहेत. चित्रपटगृह, केबल नेटवर्कद्वारे माहिती दिली जात आहे. बसस्थानक, रेल्वेस्टेशन, मॉल्स, हॉटेल्स, बँक, एटीएम आदी ठिकाणे वारंवार निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन

जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तरीही खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. कौटुंबिक कार्यक्रमानांही सार्वजनिक रुप आणू नका, तसेच मंदिर अथवा देवस्थानाला जाताना योग्य ती काळजी घ्या. घाबरू नका. पण सतर्क रहा. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केले.

हेही वाचा - भिवंडीत कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

Last Updated : Mar 12, 2020, 8:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.