ETV Bharat / state

धूम स्टाईलने मंगळसूत्र लंपास करणाऱ्यासह चोरट्या नोकरालाही बेड्या; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

author img

By

Published : May 5, 2022, 9:10 PM IST

धूम स्टाईल चोरट्याचा महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून वपोनि मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार यांच्या पथकाने तपास सुरू असता चोरटा जमील मोहमद आजम शेख याला ४ मे रोजी भिवंडीतुन ताब्यात घेऊन त्याच्याकडून साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करून त्याला अटक केली.

dhoom style mangalsutra thief arrested in bhiwandi
धूम स्टाईलने मंगळसूत्र लंपास करणाऱ्यासह चोरट्या नोकरालाही बेड्या

ठाणे - भिवंडी शहरात चोरीच्या घटनांसह धूम स्टाईलने दागिने पळविण्याच्या घटना घडतच आहे. शहरातील नारपोली पोलिसांनी अशाच दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करत धूम स्टाईलने सोन्याचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्यासह ८ लाखांच्या कपड्याची चोरी करणाऱ्या नोकरास अटक केली आहे. जमील मोहमद आजम शेख (२२ रा.अजमेर नगर,भिवंडी) आणि मदन सुरेशकुमार खंडेलवाल (२५ रा.राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

गळ्यातील मंगळसूत्र जबरीने खेचून धूम स्टाईलने पलायन - वैशाली नितीन बनसोडे (३९,रा.नवी मुंबई) ही महिला तिच्या पती व मुलांसह २० एप्रिलला दुचाकीने कल्याणहुन ठाण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी त्यांची दुचाकी मुंबई - नाशिक महामार्गावरील माणकोली ब्रिजवर येताच मागून स्पोर्ट बाईकवरून आलेल्या आरोपीने वैशाली यांच्या मानेवर जोरात थाप मारून त्यांच्या गळ्यातील १ लाख १३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचून धूम स्टाईलने पलायन केले होते. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात महिलेने २१ एप्रिलला अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला होता. या घटनेतील धूम स्टाईल चोरट्याचा महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून वपोनि मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार यांच्या पथकाने तपास सुरू असता चोरटा जमील मोहमद आजम शेख याला ४ मे रोजी भिवंडीतुन ताब्यात घेऊन त्याच्याकडून साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करून त्याला अटक केली आहे.

८ लाख ८७ हजार रुपयांचे कपडे विकून नोकर पळाला राजस्थानला - दुसऱ्या घटनेत १९ एप्रिलला 'मे.दुधाणी सिंथेटिक्स प्रा.लि.'कंपनीचे मालक मनोजकुमार मदनलाल दुधाणी (५०,रा.परेलनाका, मुंबई) ह्यांनी कपडा चोरी झाल्याने संशयावरून नोकरावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार यांनी पथकासह सुरू केला. त्यातच बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपी नोकर राजस्थानमध्ये लपून बसल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक डी.डी.पाटील, पो.ह भरत नवले, अशोक बोडके,पो.ना लक्ष्मण सहारे,सुनिल शिंदे प्रविण सोनवणे योगेश क्षिरसागर आदींच्या पथकासह आरोपी मदन सुरेशकुमार खंडेलवाल यास राजस्थान येथून ताब्यात घेऊन ४ मे रोजी अटक केली. तसेच त्याच्याकडून ८ लाख ८७ हजार ४० रुपयांच्या कपड्याचे ११२ रोल हस्तगत केला. शिवाय आरोपी नोकराकडून चोरीचा माल खरेदी करणारा रामभवन चिद्दु यादव(४७ रा.उत्तरप्रदेश) यास मुंबई येथून ताब्यात घेऊन आज अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.