ETV Bharat / state

Death Of Worker: खळबळजनक! कपडा टाकताना रोलर मशीनमध्ये अडकलेल्या कामगाराचा जागीच मृत्यू

Death Of Worker: कपडा रोलर मशीनवर काम करताना एका कामगाराचा मशिनीत अडकून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Death by Stuck in Machine) ही घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील शेलार गावच्या हद्दीत असलेल्या खेमीसती कंपनीत (Khemesati Company) शुक्रवारी पहाटे घडली. (Bhiwandi Taluka) अजय नरेश मिश्रा (वय २४, रा.शेलार, भिवंडी) असे मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. (Cloth Dyeing Company)

Death Of Worker
कामगाराचा जागीच मृत्यू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 11:01 PM IST

ठाणे Death Of Worker: कामगार डाईंग मशीनवर काम करत असताना त्याचा हात रोलर मशीनमध्ये अडकल्याने तो कपड्यासह रोलर (Death by Stuck in Machine) मशीनमध्ये खेचला गेल्याने गंभीर जखमी झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Khemesati Company) ही खळबळजनक घटना भिवंडी तालुक्यातील शेलार गावच्या हद्दीत असलेल्या खेमीसती नावाच्या कंपनीत घडली आहे. (Bhiwandi Taluka) याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अजय नरेश मिश्रा (वय २४, रा.शेलार, भिवंडी) असे मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. (Cloth Dyeing Company)

हात अडकल्याने घडला अपघात: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक अजय हा कामगार भिवंडी तालुक्यातील शेलार गावात असलेल्या खेमीसती या कपडा डाईंग कंपनीत कामाला होता. त्यातच नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे पावणे दोन वाजल्याच्या सुमारास मृतक अजय हा त्याचा सहकारी कामगार सुनील राम चौथीराम हे दोघे डाईंगमध्ये कपडा रोल करण्याच्या डेका मशीनवर काम करीत होते. त्यावेळी मृत अजय हा कपडा रोल करण्यासाठी रोलर मशीनमध्ये हाताने टाकत होता. त्याच सुमारास अचानक रोलर मशीनमध्ये त्याचा हात अडकल्याने तो कपड्यासह मशीनमध्ये जाऊन संपूर्ण रोल झाला.

कंपनीत तणावाचे वातावरण: या दुर्घटनेत त्याच्या डोक, पोट, छाती, मान, कंबर व पायाला गंभीररीत्या दुखापत झाल्याने अतिरिक्त स्त्रावाने त्याचा मशीनमध्ये जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मृत अजय सोबत काम करणाऱ्या सहकारी कामगारांनी त्याचा मृतदेह मशीन मधून बाहेर काढला होता. याघटनेची माहिती स्थानिक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी डाईंग कंपनीत येऊन अजयच्या मृत्यू प्रकरणी कंपनी मालकाला जाब विचारला. यावेळी काही काळ कंपनीत तणाव निर्माण झाला होता.

आकस्मिक मृत्यूची नोंद: दरम्यान, या घटनेची माहिती भिवंडी तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत अजयचा मृतदेह शवविच्छेदना करिता भिवंडीतील इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात रवाना केला. याप्रकरणी कामगार सुनील चौथीरामच्या फिर्यादीवरून २२ सप्टेंबर रोजी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बायेस यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष बोराटे करीत आहेत.

हेही वाचा:

  1. Boiler Explosion : बोईसर एमआयडीसीतील बॉयलरचा स्फोट, आगीत तिघांचा मृत्यू
  2. वसईत औद्योगिक कंपनीतल्या बॅायलरचा भीषण स्फोट, 1 ठार, 3 गंभीर
  3. तामिळनाडूतील 'एनएलसी'मध्ये बॉयलरचा स्फोट; ६ ठार, १२ जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.