ETV Bharat / state

ठाण्यातील कुख्यात सिद्धू स्थानबद्ध, नाशिकच्या कारागृहात रवानगी - nashik jail

कुख्यात गुंड सिद्धेश बाळा म्हसकर उर्फ सिद्धू अभंगे याच्यावर ठाणे पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. त्याला चिपळूण येथून ताब्यात घेऊन नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे.

सिद्धु अभंगेसह पोलीस
author img

By

Published : Oct 3, 2019, 9:35 PM IST

ठाणे - कुख्यात गुंड सिद्धेश बाळा म्हसकर उर्फ सिद्धू अभंगे (वय 27 वर्षे) याच्यावर ठाणे पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर त्याची नाशिक मध्यवर्ती तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - कल्याणात 35 लाख रुपयांच्या मोबाईलसह चौकडी ताब्यात

खुनाचा प्रयत्न, खंडणी, अवैद्य हत्यार बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे, हाणामारी व अमली पदार्थ विक्री आदी गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी सिद्धू आणि त्याच्या आठ ते दहा साथिदारांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिद्धू आणि त्याच्या साथीदारांनी बंदूक आणि लाठ्याकाठ्या घेऊन दहशत पसरविल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच त्याच्यावर कोपरी पोलिसात आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व गुन्ह्यात अभंगे जामिनावर बाहेर होता.

हेही वाचा - 'सत्ताधाऱ्यांनीही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी'

निवडणूक काळात उपद्रवी ठरणाऱ्या गुंडांवर कारवाई करण्यात यावी, असे ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आदेश दिले होते. त्यानुसार चितळसर पोलिसांनी सिद्धूच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली. त्यानंतर गुंड सिद्धूची रवानगी नाशिक मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली आहे.

हेही वाचा - उमेदवारी न मिळाल्याने नाराज पण...

Intro:ठाण्यातील यु ट्यूब भाई चिपळूण मधून ताब्यातBody:
कुख्यात गुंड सिद्धेश बाळा म्हसकर उर्फ सिद्धेश उर्फ सिद्धू अभंगे (27) याच्यावर ठाणे पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. या कारवाई नंतर त्याची नाशिक मध्यवर्ती तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खुनाचा प्रयत्न, खंडणी, अवैद्य हत्यार बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे, मारामारी व अमली पदार्थ विक्री आदी गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी सिद्धू व त्याच्या आठ ते दहा साथिदारांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिद्धू आणि त्याच्या साथिदारांनी बंदूक आणि लाठ्याकाठ्या घेऊन दहशत पसरविल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच त्याच्यावर कोपरी पोलिसात आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व गुन्ह्यात अभंगे जामिनावर बाहेर होता. दरम्यान, निवडणूक काळात उपद्रवी ठरणाऱ्या गुंडांवर कारवाई करण्यात यावी असे ठाणे पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते. त्यानुसार चितळसर पोलिसांनी सिद्धूच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली. त्यानंतर गुंड सिद्धूची रवानगी नाशिक मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.