ETV Bharat / state

काळा पडलो तरी चालेल पण कोरोना होऊ देणार नाही, गुराख्याचा कोरोनापासून बचावासाठी अजब फंडा

author img

By

Published : May 12, 2021, 8:08 PM IST

कोरोनाची लागण होऊ नये म्हणून एक गुराखी चक्क उन्हात उघड्या अंगाने फिरत असल्याचा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तयार करणाऱ्याने त्या गुराख्याला विचारले की, उन्हात का फिरतो? तर त्याला या गुराख्याने अजब उत्तर दिले आहे. मी उन्हात फिरतो म्हणून मला कोरोना होत नाही, जे सावलीत राहतात त्यांना कोरोना होतो मला होणार नाही, असं या गुराख्याने म्हटले आहे.

गुराख्याचा कोरोनापासून बचावासाठी अजब फंडा

ठाणे - कोरोनाची लागण होऊ नये म्हणून एक गुराखी चक्क उन्हात उघड्या अंगाने फिरत असल्याचा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तयार करणाऱ्याने त्या गुराख्याला विचारले की, उन्हात का फिरतो? तर त्याला या गुराख्याने अजब उत्तर दिले आहे, मी उन्हात फिरतो म्हणून मला कोरोना होत नाही, जे सावलीत राहतात त्यांना कोरोना होतो मला होणार नाही. तर त्याला पुन्हा विचारले की, 'उन्हात फिरून काळा पडला तर यावर उत्तर देताना तो म्हणाला काळा पडलो तरी चालेल, पण कोरोना होऊ देणार नाही. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. नरेश सखाराम भोये असे या गुराख्याचे नाव आहे. तो भिवंडी तालुक्यातील वारेट गावचा रहिवाशी आहे.

ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ

दुसरीकडे करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात सुद्धा दररोज ५० ते ८० बाधित रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागातील गोदामात काम करण्यासाठी विविध ठिकाणांवरून आलेल्या कामगारांमुळे कोरोनाचा धोका वाढल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वी ५०० रुपयांत बनावट कोरोना अहवाल देणाऱ्या मैहफुज पॅथेलॉजी लॅबवर भिवंडी गुन्हे शाखेने छापा मारला होता. या छापेमारीमध्ये कोरोनाच्या अहवालासाठी सुमारे पाचशे कामगारांच्या आधारकार्डचे झेरॉक्स घेऊन ठेवल्याचे या लॅबमध्ये आढळून आले. अशा अनेक बनावट लॅब कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे अशा बनावट रिपोर्टच्या आधारे अनेक कामगार कामावर येतात व त्यांच्यासोबतच इतरांना देखील कोरोना होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाची भीती मनात असल्याने या गुराख्याने त्यावर अनोखा उपाय शोधून काढला आहे. हा गुराखी उन्हात कपडे न घालता फिरतो आहे, असे केल्याने आपल्याला कोरोना होणार नाही असा दावा त्याने केला आहे. मात्र त्याची ही कृती त्याच्या जीवावर देखील बेतू शकते, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य ते औषोपचार घ्यावेत असे आवाहन श्रमजीवी संघटनेचे नेते प्रमोद पवार यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना केले आहे.

हेही वाचा - तेहलकाचा माजी संपादक तरुण तेजपाल प्रकरणाचा निकाल १९ मे रोजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.