ETV Bharat / state

Eknath Shinde : विकासकामांमुळे पोटदुखी होत असेल तर 'आपला दवाखाना' मध्ये मोफत उपचार घ्या; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

राज्यातील विकासकामांमुळे ज्यांना पोटदुखी होत आहे त्यांनी 'आपला दवाखाना' मध्ये मोफत उपचार घ्यावे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली आहे. ते ठाण्यातील जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी बोलत होते.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे
author img

By

Published : Apr 22, 2023, 10:36 PM IST

Updated : Apr 22, 2023, 10:47 PM IST

ठाणे : ठाण्यातील सिव्हील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मुंबई ठाण्यासह राज्यभरात विकासाची आणि आरोग्याची कामे होत आहेत. त्यामुळे काहीजणांना पोटदुखी होत आहे. त्यांनी 'स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' येथे जाऊन मोफत उपचार घ्यावेत, अशी खरमरीत टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी साखरविषयात डाॅक्टरेट मिळवल्यामुळे काही लोकांची साखर वाढली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Eknath Shinde
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयाच्या भूमिपूजन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा : कोरोना काळात सिव्हील रुग्णालयात सुपर स्पेशालिटी सुविधा देऊन रुग्णांचे प्राण वाचवल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. मुंबई ठाण्यासह राज्यभरात सुरु असलेल्या आरोग्य विषयक तसेच विकास कामांवरून काही जणांच्या पोटत दुखते आहे. अशा लोकांसाठी 'स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' आहे. तेथे त्यांनी मोफत उपचार करून घ्यावेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. 1936 साली उभारण्यात आलेले ठाण्यातील विठ्ठल सायन्ना रुग्णालयाने कात टाकली असून हे रुग्णालय पाडून या ठिकाणी 900 खाटांचे सुसज्ज असे वातानुकूलित जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालय उभे राहणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

Eknath Shinde
रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भूमिपूजनासाठी शामियाना उभारला : खारगर इथे शासकीय कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेनंतर दुपारी 12 ते 5 दरम्यान उघड्या मैदानावर शासकीय कार्यक्रम घेऊ नयेत, असा आदेश शासनाच्या वतीने काढण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णालयाचा भूमिपूजन कार्यक्रमासाठी शामियाना उभारला गेला होता. तसेच संपूर्ण कार्यक्रम वातानुकूलित सभागृहात झाला, जेथे कोणालाही त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली होती. यावेळी प्रत्येक ठिकाणी ओआरएस देखील उपलब्ध करण्यात आले होते. त्याचप्रमाणे कुणाला त्रास झालाच तर सहा स्ट्रेचर तसेच अतिरिक्त आयसीयू वॉर्ड देखील तैनात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका बोर्ड तसेच जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित होते.

हेही वाचा : Meal According To Caste : पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही जातिभेद; गावजेवणात जातीनुसार बसतात पंगती, 'अंनिस'ने केली कारवाईची मागणी

Last Updated : Apr 22, 2023, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.