ठाणे : पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या धावत्या सिंहगड एक्प्रेसमध्ये आज सकाळच्या गर्दीच्या वेळी धावत्या एक्प्रेसमध्ये महिलांचे व्हिडिओ काढणाऱ्या मदरसामधील एका विकृत शिक्षकाला प्रवाशांनी व्हिडीओ काढताना रंगेहात पकडून चोपल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे हा विकृत शिक्षक गेल्या दोन दिवसापासून याच सिंहगड एक्प्रेसमध्ये महिलांचे व्हिडिओ काढून त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही समोर आले. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल : याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात विकृत शिक्षकावर पोक्ससह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मोहम्मद अश्रफ असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकांचे नाव आहे. आरोपी मोहम्मद अश्रफ हा मूळचा बिहार राज्यातील रहिवाशी आहे. तो बिहार मधील सीतामढीच्या एका मदरसामध्ये शिक्षक म्हणून काम करीत होता. त्यातच काही दिवसापासून तो पुणे ते मुबंई सिंहगड एक्प्रेसमध्ये सकाळच्या सुमारास प्रवास करत असताना, धावत्या सिंहगड एक्प्रेस मध्ये महिलांचे व्हिडीओ, फोटो काढत होता. मात्र, ही बाब काही प्रवाशांच्या लक्षात आली. विशेष म्हणजे विकृत आरोपीला बुधवारी देखील अशाच प्रकारे महिलांचे व्हिडीओ काढुन त्यांना छेडण्याचा प्रयत्न करत होता.
रंगेहात पकडले : पुन्हा आज सकाळच्या सुमारास गुरुवारी व्हिडीओ काढत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. त्यावेळी महिलांनी देखील आरडाओरडा केला. हा सर्व प्रकार धावत्या सिंहगड एक्प्रेसमध्ये सुरू होता. ट्रेन बदलापूरहुन अंबरनाथच्या दिशेने पुढे जात होती. त्यामुळे काही प्रवाशांनी ही बाब कल्याण लोहमार्ग पोलिसांनी कळवली. त्यानंतर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी क्षणाचाही विलंब न करता कल्याण रेल्वे स्थनाकात लोहमार्ग पोलिसांचे पथक रवाने केले.
संशाय आल्यास पोलिसांना कळवा : कल्याण रेल्वे स्थानकात सिहंगड एक्सप्रेस येताच रेल्वे पोलीसांनी त्याला प्रवाशांकडून ताब्यात घेतले. त्यानंतर मोहम्मद अश्रफ या विकृत शिक्षकावर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात भादवी कलम 354 ड, पॉक्सो कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सदरचा गुन्हा मध्यरेल्वेच्या कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात वर्ग करून आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच महिला प्रवाशांनी असा संशायास्पद प्रकार दिसल्यास याबाबत रेल्वे पोलिसांना कळवावे असे अवाहन पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी केले आहे.
हेही वाचा - BJP Foundation Day : भाजपचा विदर्भात खडतर प्रवास; पक्ष विस्तारासाठी विदर्भात नेत्यांचे अपार कष्ट