ETV Bharat / state

Python Photo: मृत अजगरासोबत फोटोसेशन पडले महागात, तरुणाला वनाधिकाऱ्यांची नोटीस

author img

By

Published : Oct 30, 2022, 1:22 PM IST

Updated : Oct 30, 2022, 2:04 PM IST

अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावाजवळ महाकाय असलेला अजगर मृत (dead python) अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर एका तरुणासोबत मृत अजगराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली (picture with dead python viral on social media) आहे.

Python Klled
अजगराची हत्या करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा

ठाणे : अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावाजवळ महाकाय असलेला अजगर मृत (dead python) अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर एका तरुणासोबत मृत अजगराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली (picture with dead python viral on social media) आहे.

तपास सुरु : या महाकाय अजगराला ठेचून मारल्याने (killed python) जबडा पूर्णतः चेंदामेंदा झाल्याचे व्हायरल फोटोमधून दिसून येत आहे. यावरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाकाय अजगराची हत्या करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात वन विभागाच्या बदलापूर मुख्य कार्यलयात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. तर मृत अजगरासोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तरुणाला वन अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आली आहे. प्रवीण पवार असे मृत अजगरासोबत फोटो सेशन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

मृत अजगराचे अवशेष ताब्यात : अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावाजवळ खोणी तळोजा राज्य महामार्गाच्या कडेला असलेल्या उसाटने गावात एका व्यक्तीचे मृत अजगरा सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर प्राणी मित्रांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली, त्यानंतर बदलापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन या मृत अजगराचे अवशेष ताब्यात घेतले आहेत. तसेच सोशल मीडियावर मृत अजगरासोबत फोटोमध्ये दिसणाऱ्या प्रवीण पवार याला वन अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवण्यात आली (Notice to young man) आहे.

गुन्हा दाखल : हा महाकाय अजगर वाहनाखाली येऊन मृत झाला, की त्याची ठेचून हत्या करण्यात आली याचा तपास वन विभाग करत आहे. हा महाकाय अजगर आठ ते नऊ फूट लांबीचा अजगर असून तो अनुसूचित वर्ग एकमधील प्राणी आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात वन विभागाने गुन्हा दाखल केला असून वन पथकासह स्थानिक पोलीस अधिक तपास करीत (case against unknown person who killed python) आहे

Last Updated : Oct 30, 2022, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.