ETV Bharat / state

Thane Crime News : भावाचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे; बहीण करत होती व्हिडिओ, दोघांना अटक - अल्पवयीन मुलीशी चाळे

भाऊ-बहिणीतील प्रेमाचं प्रतीक म्हणून रक्षाबंधन (Raksha Bandhan) सण साजरा केला जातो. रक्षाबंधन सणाच्या एक दिवस आधी भाऊ-बहिणीच्या कृत्यानं खळबळ माजली आहे. भाऊ अल्पवयीन मुलीशी चाळे करत असताना या बहिणीनं असं काही केलं की आरोपी बहिण-भावाला बेड्या ठोकल्या आहेत.

Thane Crime News
भाऊ - बहिणीला अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 7:10 PM IST

ठाणे : कल्याणमध्ये २० वर्षीय आरोपीनं शेजारी राहणाऱ्या, एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीशी आश्लील चाळे केले. यावेळी आरोपीच्या २४ वर्षीय बहिणीनं त्याचं चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील सिद्धार्थ नगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आश्लील चाळे करणाऱ्या आरोपीसह, मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या आरोपीच्या बहिणी विरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.

मोबाईलमध्ये केले चित्रीकरण : १२ वर्षीय पीडित मुलगी आणि आरोपी भाऊ बहिणी हे कल्याण पूर्वेतील एकाच भागात शेजारी म्हणून राहतात. त्यामुळे आरोपी आणि पीडित हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. याच ओळखीचा फायदा घेऊन २६ ऑगस्ट रोजी पीडित मुलगी घराच्या परिसरात खेळत असताना, या दोघा आरोपी भाऊ बहिणीची नजर तिच्यावर पडली. त्यानंतर तिच्या जवळ जाऊन आरोपीने पीडित मुलीशी आश्लील चाळे करत असतानाच, आरोपीच्या बहिणीने या घटनेचं मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं. दुसरीकडे या घटनेमुळं घाबरलेल्या पीडित मुलीनं आरोपीच्या तावडीतून पळ काढून घर गाठलं होतं.

बहिणी भावाला ठोकल्या बेड्या : पीडित मुलगी या घटनेमुळे घाबरून तिनं घडलेली घटना तिच्या आईला सांगताच तिला धक्काच बसला. त्यानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी पीडित मुलीच्या ३२ वर्षीय आईच्या तक्रारीवरून २९ ऑगस्ट रोजी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. भादंवि कलम ३५४, ३४ सह पोक्सो कायद्यानुसार काही तासातच आरोपी बहिण भावाला बेड्या ठोकल्या आहे.

परिसरात एकच खळबळ उडाली : आरोपी भाऊ बहिणीचे वडील एका कंपनीत मोठ्या हुद्यावर कार्यरत आहेत. तर आई एका बँकेत लिपिक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या मुलांनी केलेल्या अशा कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर रक्षाबंधन (Raksha Bandhan) सणाच्या पूर्वसंध्येला भाऊ बहिणीने केलेलं कृत्य उघडकीस येऊन, त्यांच्या हातात राखी बांधण्याऐवजी पोलिसांच्या बेड्या पडल्या आहेत.

हेही वाचा -

  1. Shiv Sena Women Beaten Manager : महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील चाळे करणाऱ्या विमा कंपनीच्या मॅनेजरला भररस्त्यात चोपले
  2. Mumbai Crime News: धावत्या लोकलमध्ये विनयभंगाचे सत्र सुरू; तरूणाने अश्लील चाळे आणि शिवीगाळ करत केला तरूणीची छेड काढण्याचा प्रयत्न
  3. Girl Beaten Man In Lucknow Mall : अश्लिल चाळे करणाऱ्या युवकाला तरुणीकडून बेदम चोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.