ETV Bharat / state

Beating in Crematorium : अंत्यसंस्कारादरम्यानच स्मशानभूमीत मारहाण; मानपाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

author img

By

Published : Feb 26, 2022, 7:56 PM IST

अंत्यविधीदरम्यान स्माशनभूमीत नातेवाईकाला कुऱ्हाड व कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत अंत्यविधी रोखल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ( Beating in Crematorium Kalyan Gharivali ) ही घटना कल्याण तालुक्यातील घारीवली गावातील स्माशनभूमीत घडली. याप्रकरणी ५ आरोपींविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Manpada Police Station )

manpada police station
मानपाडा पोलीस ठाणे

ठाणे - अंत्यविधीदरम्यान स्माशनभूमीत नातेवाईकाला कुऱ्हाड व कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत अंत्यविधी रोखल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ( Beating in Crematorium Kalyan Gharivali ) ही घटना कल्याण तालुक्यातील घारीवली गावातील स्माशनभूमीत घडली. याप्रकरणी ५ आरोपींविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Manpada Police Station ) गुरुनाथ पाटील, बाळकृष्ण पाटील, सुनील पाटील, सुभाष पाटील, कुसुम पाटील (सर्व रा. घारीवली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

जागेच्या वादातून प्रेत जाळण्यास मनाई -

कल्याण तालुक्यातील निळीजे गावालगत घारीवली गावात तक्रारदार सचिन पाटील (वय ४२) हे कुटूंबासह राहतात. १६ फेब्रुवारी रोजी त्यांचे चुलते केशव पाटील यांचे निधन झाले होते. त्यामुळे नातेवाईकांनी त्याच दिवशी सांयकाळी साडे चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घारीवली गावातील पाण्याच्या टाकी शेजारी असलेल्या स्माशनभूमीत नेले होते. मात्र, याठिकाणी आदीच पाचही आरोपींनी आमची जागा आहे, असे बोलून स्माशनभूमीत अत्यंविधीदरम्यान सचिन पाटील यांच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी कुऱ्हाड व लोखंडी कोयते हातात घेऊन सचिन पाटील व त्याचा भाऊ दोघांवरही धावू गेले. यावेळी अंत्यविधीसाठी आलेल्या इतर नागरिकांनी हे पाहून स्माशनभूमीतुन पळ काढला होता. त्यानंतर सचिन व त्यांच्या भावाला पाचही आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली.

हेही वाचा - The Desperate Thief : 'मी काहीही चोरेले नाही.. तुम्हीच भिकारी' हताश चोराचा संताप व्यक्त करून पोबारा

दहाव्याच्या विधीचा कार्यक्रम उरकून गुन्हा दाखल -

घडलेली घटना मानवतेला काळिमा फासणारी असल्याने तक्रारदार सचिन पाटील मृतकचुलते यांचा १० दिवसांनी दहाव्याच्या विधीचा कार्यक्रम उरकून काल (शुक्रवारी ) मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर याप्रकरणी पाचही आरोपींविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. तर या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश मदने करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.